
डोंबिवली: डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पारधे व संध्या पारधे यांची मोठी मुलगी भारती ही थॅलेसिया आजाराने मृत पावली. तिच्या मृत्यूपूर्वी आजारपणात पारधे कुटुंबांनी जे अनुभवलं, या थँलेसिमिया रुग्णांना रक्ताची किती गरज लागते व कुटुंबाची कशी ओढाताण होते हे बघितलं आहे. आणि आपली मुलगी भारती ही या आजाराने मृत्यू पावली असली तरी इतर थैलीसेमीया रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून पारधे कुटुंबाने आपल्या सहकारी मित्रांना विश्वासात घेवून भारती फाउंडेशन ही संस्था नोंदणी करून या संस्थेच्या माध्यमातून आपल्या मुलीच्या स्मृतिदिनानिमित्त प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनेक थेलेसीमिया रुग्णांना रक्तपुरवठा करण्यासाठी मदत करतात. भारती फाउंडेशनच्या उपक्रमामुळे थॅलेसिमिया रुग्णांना एक नवी संजीवनी देण्याचा काम भारती फाउंडेशन करीत आहे या संस्थेचा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा असे मनोगत निर्णायक एल्गार चे संपादक आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत दादाभाऊ अभंग यांनी भारतीय फाउंडेशन आयोजित केलेल्या रक्त सुविधांना रक्त शिबिरात व्यक्त केले. भारतीय फाउंडेशनच्या वतीने दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी नाना-नानी पार्क डोंबिवली (पूर्व) येथे भारती सूर्यकांत पारधे हीचा सहावा स्मृतिदिन सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा संपन्न झाला. भारती फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यापूर्वी भारतीला मान्यवरांनी श्रध्दांजली अर्पण करून रक्त संकलन गाडीचे रिबीन कापून रमेशभाई लखमाणी याच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले त्या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दादाभाऊ अभंग, समाजसेविका सरिता किशोर डाकरे (मुंबई), किशोर कोतवडेकर, भारती फाउंडेशनचे अध्यक्ष सूर्यकांत पारधे, संध्या पारधे, सचिव सचिन साळवी, सुचित्रा सचिन साळवी, एस बी जाधव, खजिनदार प्रशांत धिवर, दिनेश खरोटे, राजेश पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला त्याचा रक्तदान करतानाचा त्यांचा फोटो कपावर प्रिंट करुण देण्यात आला. ही इन्स्टंट भेट वस्तू सर्वच रक्तदात्यांना खूप आवडली. गुरूवार कामकाजाचा दिवस असून सुद्धा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. शिबिराला भरघोस प्रतिसाद मिळाला हे भारती फाउंडेशनचे यश आहे.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी भारती फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी, व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या यशात कोणाचा एकाचा वाटा नसून अनेक हात जोडले गेलेले असतात कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज फॉरवड केले तर कोणी स्टेटस वर बॅनर ठेवले. काहींना इच्छा असून सुद्धा पोहचले नाहीत आणि काही तर रोडचे वाटसरूनी पण रक्तदान केले त्या सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद.
विशेष आभार म्हणजे सर्व रक्तदान ग्रुप , सफायार बँकेट हॉल, रोटरी क्लब ऑफ इंडिस्त्रियल एरिया , शिवसेना नेते सदानंद थरवळ या सर्वांचे मनपूर्वक आभार भारती फाउंडेशनचे अध्यक्ष सूर्यकांत पारधे व कार्याध्यक्ष रविकिरण मस्के यांनी मानले.