बुलढाणा: विजयस्तंभ भीमा कोरेगाव, आंबेडकरी समुदायाचे आणि भारतातील एका लढवय्या बौद्ध बांधवांचे शौर्याचे, ऐतिहासिक पराक्रमाचे, अस्मितेचे आणि अस्तित्वाचे प्रमाण आहे, आणि म्हणून भारतीय सैन्यातील विशाल महार रेजिमेंट च्या कॅप वर आणि बेल्टवर हा विजयस्तंभ अंकित आहे, म्हणजे च एका महार सैनिकाचे सर्वस्व आहे, आण, बाण, आणि शान आहे, विजयस्तंभ म्हणजे महार सैनिकांन साठी कौमी पराक्रमाचे प्रतीक आणि निशाण आहे आणि एक प्रामाणिक शूर सैनिक जगतो, मरतो तो फक्त नाम, नमक, आणि निशाण करिता आणि हे निशाण म्हणजे विजयस्तंभ आणि या विजयस्तंभ चा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक पुरावा देऊन, १जानेवारी १८१८ च्या युद्धातील तत्कलीन महार शौर्या चा दाखला दिला व महार रेजिमेंट ची स्थापना केली आणि याच महार रेजिमेंट मुळे प्रत्येक महार सैनिकांना वैभव मिळालं आहे आपल्या दोन पिढ्या आनंदाने जगत आहेत, परंतु आज हा विजयस्तंभ बंधनात अतिक्रमणात आहे, आणि म्हणून विजयस्तंभाला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महार रेजिमेंट च्या यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या माजी सैनिकांनी विजयस्तंभ बचाव जनजागृती अभियान सुरु केले आहे, त्याची सुरवात क्रांती भूमी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद, नामविस्तार दिनी औरंगाबाद इथून सुरुवात केली, आणि एक प्रकारे अतिक्रमणधाऱ्याला एक इशाराच दिला, महार रेजिमेंटचे सैनिक विजयस्तंभ अतिक्रमणमुक्ती साठी मैदानात उतरले आहेत, समस्त सैनिकांना आवाहन करतो की आपण महार रेजिमेंट च्या सैनिकांचे सर्वस्व, अस्तित्व, स्वाभिमान सम्मान असलेलं शौर्या चे प्रतीक विजयस्तंभ अतिक्रमणमुक्ती च्या लढ्यात तन मन धनाने सहभागी व्हावे, हा लढा भीमा कोरेगाव विजय स्तंभ संरक्षण व सवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग निःस्वार्थपणे लढत असून आम्ही सर्व सैनिक त्यांच्या पाठीशी आहोत असे महार रेजिमेंट चे माजी सैनिक व यश सिध्दी सैनिक सेवा संघाचे संयोजक अनिल डोंगरदिवे यांनी आपला पाठिंबा दिला आहे..तसेच सर्वांनी या लढ्यात सामील व्हा सर आवाहन आंबेडकरी समाजाला केले आहे.
