कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीची पदाधिकारी ZOOM ऑनलाईन बैठक संपन्न…पुढील बैठक २ जुलै रात्री ९.०० वाजता…

Share


मुंबई… कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती पदाधिकारी व हितचिंतक यांची ऑनलाइन ZOOM बैठक शनिवार दिनांक २७ जून २०२६ रोजी पार पडली. या बैठकीला सर्व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे पदाधिकारी आणि हिंतचिंतक उपस्थित होते. या बैठकीला कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग हे भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क न्यायालयीन लढा या विषयावर मार्गदर्शन केले. बैठकीला रतन अस्वारे, संजय धावारे, किरण जाधव, सुनील बोर्डे, ललिताताई घनसावध, संध्याताई खरे, भरत टपाल, यशवंत खरात, सुनील बोर्डे, कुणाल बागुल, जयेंद्र गायकवाड, महावीर कांबळे, विलास काळे, उमेश घायवट, मजरभाई पठाण, सुनील खैरनार, चेतन गायकवाड, गणेश ठोकळे, उमेश घायवट , महेश शेलार, सुनील कांबळे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मिटिंगचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले.
पुढील ZOOM मीटिंग गुरुवार दिनांक २ जुलै २०२६ रोजी रात्री ९.०० वाजता होणार आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रवीण भोटकर आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष समाजभूषण संजय धावारे यांनी केले आहे. या बैठकीला पदाधिकाऱ्यांनी गंभीर कारणाशिवाय गैरहजर राहिल्यास त्या पदाधिकाऱ्यांना कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या ऐतिहासिक लढ्यात स्वास्थ्य नाही असे समजून त्या पदाधिकाऱ्याला पदमुक्त करण्यात येईल व तो पदाधिकारी हा समितीचा हितचिंतक असेल असे ही त्यांनी सांगितले आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती
टीप: महिला पदाधिकाऱ्यांना या बैठकीत उपस्थित राहणे अनिवार्य नाही पण त्यांना बैठकीत उपस्थिती दाखवायची असेल तर स्वागत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *