डोंबिवली: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे नागालँड विधानसभेत श्री. इम्तीचोबा व श्री. वाय. लिमा ओनेन चँग असे दोन आमदार निवडून आल्यामुळे संपूर्ण भारतात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्यावतीने मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू आहे. महाराष्ट्रात तसेच कल्याण-डोंबिवली जिल्ह्यातही हा जल्लोष साजरा करण्यात आला. डोंबिवलीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे नेते माणिकराव उघडे यांनी दिनांक ३/३/२०२३ रोजी डोंबिवली शहरात पेढे वाटप कार्यक्रम करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील निवडून आलेल्या दोन्ही आमदारांना शुभेच्छा देऊन आनंद उत्सव साजरा केला. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणराव आंभोरे, कल्याण डोंबिवली जिल्हा संपर्कप्रमुख तुकाराम पवार, कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे संघटक वसंत टेकाळे, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संपर्कप्रमुख राजू दोंदे, अरुण सूर्यवंशी, एकनाथ शेळके, सुरेश जाधव, चंद्रकांत ठुकरुल, संजय पवार, विकास खैरनार आदी तमाम कार्यकर्ते उपस्थित होते.
