संविधान विरोधी भाजपला पराभूत करण्यासाठी आनंदराज आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या पाठिंब्याचे जनतेने स्वागत करावे..समाजभूषण वसंत कांबळे

Share

मुंबई: सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी पुणे येथील फेब्रुवारी 2023 मध्ये होत असलेल्या ‘कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड ‘ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ला दिलेला पाठिंबा हा निर्णय अंत्यंत अभिनंदनीय असून सद्यस्थितीत काळानुरूप निर्णय आहे. वेळची दिशा आणि देशातील सध्यस्थिती ओळखून घेतलेला योग्य हा निर्णय जबाबदारीने घेतलेला आहे.समाज व आंबेडकरी विचार धारा आणि आंबेडकरवाद, संविधान विचारधारा कायम राहण्यासाठी समर्पक आहे.आनंदाज आंबेडकरांनी राजकीय परिपक्वता दाखवत , आंबेडकरी समुहाला आणि चळवळ योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी हा निर्णय फार सुंदर आहे.आंनदराज आंबेडकर आंबेडकरवादी समुहाला सही दिशेने घेऊन जात आहेत हे निश्चित झाले आहे आंबेडकरी जनतेने या निर्णयाचे स्वागत करावे असे आवाहन समाज भूषण वसंत कांबळे आरेकर यांनी केले आहे. यावेळी सुरेश घोलप, किशोर जाधव, महेन्द्र मनोहर, विजय खंदारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *