भिम टायगर वाय.आर. लोंढे हे रेल्वेच्या सेवेतून निवृत्त झाले असले तरी अखेरचा श्वास असेपर्यंत आंबेडकरी चळवळीतून निवृत्त होणार नाही: दादाभाऊ अभंग

Share

बदलापूर: रेल्वे कामगार नेते, आंबेडकरी चळवळीतील विद्रोही कवी भीम टायगर आयु. वाय. आर. लोंढे हे रेल्वेच्या सेवेतून निवृत्त झाले असले तरी ते आंबेडकरी चळवळीतून कधीच निवृत्त होणार नाहीत याउलट आता ते अत्यंत जोमाने काम करतील,भीमा- कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण विरोधी लढ्यात ते सुरुवातीपासून काम करीत असून यापुढेही ते काम करतील अशा प्रकारची अपेक्षा भीमा- कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समितीचे अध्यक्ष व निर्णायक एल्गार चे संपादक दादाभाऊ अभंग यांनी भिम टायगर वाय.आर. लोंढे यांच्या सेवानिवृत्ती व वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले. वाय.आर. लोंढे यांचा वाढदिवस व सेवानिवृत्ती कार्यक्रम यशस्विनी हॉल, बदलापूर येथे दिनांक १ मार्च २०२३ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेल्वे कामगार नेते विद्याधर वाघमारे होते. यावेळी वाय.आर लोंढे यांचे कुटुंब, नातेवाईक, रेल्वे कामगार, अधिकारी, व सामाजिक तसेच राजकीय चळवळीतील मोठा मित्रपरिवार उपस्थित होता. वाय. आर. लोंढे यांचा व त्यांच्या सहचारीणी व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे सतत उभ्या असलेल्या आयुष्यमती जयश्रीताई वाय. लोंढे यांचा सत्कार अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी वाढदिवसाची केक कापून सर्वांनी आनंद उत्सव साजरा करून लोंढे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश सावंत, निवृत्त न्यायधिश डी. के. सोनवणे, दलित पॅंथरचे लढाऊ नेते सुरेश केदारे, रेल्वे कामगार नेते सतीश केदारे, कामगार नेते सागर तायडे, त्रिभुवन गुरुजी, जगजीवन राम, भाई कांबळे, अनंत पारदुले यांनी लोंढे यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदलापूरचे नेते व माजी नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांनी वाय.आर. लोंढे यांचा विशेष सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक अहीरे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित वाय. लोंढे आणि डॉ. सत्यजीत लोंढे यांनी मेहनत घेतली.
समारंभास उपस्थित आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्ते नातेवाईक, जिवलग मित्र, SRBKU व SC/ST ASSON. चे पदाधिकारी, मान्यवर ज्येष्ठ नेते सुरेश सावंत, पँथर सुरेश केदारे, माजी न्यायधीश डी.के. सोनवणे,
दादाभाऊ अभंग, सागर तायडे, प्रभाकर पाटील, विद्याधर वाघमारे, सतीश केदारे, मिलिंद देहाडे, दिपक अहिरे, प्रा.एकनाथ जाधव सर , अनंत पारदुले, भाई कांबळे, सुमेध जाधव, अरुण केदारे, दिलीप बनसोडे, संतोष कडाळे, धम्मप्रचारक त्रिभुवन गुरुजी, गौतम सांगळे, मास्टर राजरत्न राजगुरू, दिलीपसेठ पवार, महेंद्र नवगिरे, प्रकाश पगारे, रितेश अंभोरे, जाधव गुरुजी, गौतम सर, विजय साबळे, राजेश गवळी, बर्वे साहेब,कोमटे साहेब, सुखदेव कांबळे, संपतराव कसबे, संजय कांबळे, विकास काकडे, घनघाव साहेब, पी.वाय.कदम, प्रकाश रणपिसे, हेमंत गांधले, मामा रविराज सुकाळे, तसेच अन्य मान्यवर या सर्वांचे वाय. आर. लोंढे यांनी कार्यक्रमास उपस्थितीत राहिल्याबद्दल खुप खुप आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *