भीमा-कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण व न्यायलयीन लढा जनजागृती अभियान क्रांतीभूमी महाड येथे संपन्न

Share

महाड: भीमा- कोरेगाव जयस्तंभ परिसरात माळवदकर कुटुंबाने जे अतिक्रमण केलेले आहे व जयस्तंभाच्या सातबारा उताऱ्यात स्वतःच्या कुटुंबाची नावे इतर अधिकारात समाविष्ट केली आहेत या विरोधात भिमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग हे प्रशासकीय व न्यायालयीन लढा समितीच्यावतीने मागील अनेक वर्षे लढत आहे. अनेक निकाल हे समितीच्या बाजूने लागले असले तरी ही न्यायालयीन लढाई अजूनही सुरू आहे. या न्यायालय लढ्याची माहिती सर्व जनतेला समजावी म्हणून भीमा कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढाई जनजागृती अभियान हे मागील काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी राबविण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबर २०२२ रोजी मुंबई, २५डिसेंबर २०२२ रोजी धम्मभूमी, देहूरोड, १ जानेवारी २०२३ रोजी शौर्यदिनी भीमा कोरेगाव, १४जानेवारी २०२३रोजी नामविस्तारदिनी छत्रपती संभाजी महाराज नगर (औरंगाबाद),येथे व २० मार्च २०२३ रोजी महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी क्रांती भूमी महाड येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले या अभियान अंतर्गत आंबेडकरी जनतेला नेमकी ही लढाई काय आहे हे समजून सांगण्यात आले व प्रत्येकाला पत्रके वितरित करण्यात आली.यावेळी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. पत्रके वितरित करण्यासाठी ठाणे येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बेळमकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन साळवे, पत्रकार राजेश गवळी, सामाजिक कार्यकर्ते राज बाळदकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत अडसुळे, तसेच अभियान समितीचे ऋतिक कांबळे, दर्शना निवळकर आदींनी प्रचंड मेहनत घेतली. यापुढेही जनजागृती अभियान असेच चालू राहणार असून या अतिक्रमण न्यायालय लढ्यामध्ये आंबेडकरी जनतेने मोठ्या प्रमाणात सामील व्हावे असे आवाहन भीमा- कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *