भीमा-कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण दिवाणी (पुणे) न्यायालय लढाई शेवटपर्यंत लढणार… ॲड. नितीन मेश्राम

Share

भीमा -कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण दिवाणी (पुणे) न्यायालय लढाई शेवटपर्यंत लढणार… ॲड. नितीन मेश्राम

पुणे : भीमा – कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण व मालकी हक्क ही न्यायलयीन लढाई पुण्यामध्ये दिवाणी न्यायालयात सुरू असून भीमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समिती (रजी) या संस्थेतर्फे मी कामकाज बघत असून ही दिवाणी न्यायालयीन लढाई शेवटपर्यंत लढणार आहे असे मनोगत सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील ॲड. नितीन मेश्राम यांनी पुणे येथे केले. भीमा-कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण व न्यायालय लढाईसाठी ॲड. नितीन मेश्राम हे दिल्लीवरून पुण्याला येतात सुरुवातीपासून त्यांनी ही न्यायालय लढाई सुरू ठेवली असून आंबेडकरी समाजाने भीमा -कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य करावे असे आवाहन भीमा – कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी केले. भीमा -कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण ही अस्मितेची लढाई असून या न्यायलय लढ्याला एअर कार्पोरेशन एस.सी./एस. टी. एम्प्लॉइज असोसिएशन सर्वोतोपरी सहकार्य करील असे ठाम मत एअर कार्पोरेशन एस.सी/ एस.टी. असोसिएशन एअर इंडिया मुंबईचे सरचिटणीस आयु.आर. वाय. बनकर यांनी मांडले.
भीमा -कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण दिवाणी न्यायालय प्रकरण पुणे येथे सुरू असून १४ मार्च २०२३ रोजी न्यायालयाची सुनावणीची होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड. नितीन मेश्राम, मुंबई उच्च न्यायालयाचे (नागपूर खंडपीठ) ॲड शंकर बोरकुटे, पुणे येथील न्यायालय लढ्याचे कामकाज बघणारे ॲड. राहुल ढाले, भीमा -कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग, एअर कार्पोरेशन एस.सी./एस. टी. एम्प्लॉइज असोसिएशन एअर इंडिया मुंबईचे सरचिटणीस आयु.आर. वाय. बनकर, खजिनदार आयु. संतोष रूके, एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आयु. अरुण घुसळे, ॲड. राज जाधव आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *