मुंबई: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी काम केलेले आहे. महिला,शेतकरी, शेत मजूर, कामगार, शोषित,पीडित तसेच विविध सामाजिक घटकातील वंचित घटकांना त्यांनी सामाजिक न्याय मिळवून दिला आहे. भारताच्या संविधानाच्या माध्यमातून महिलांना समानतेचा अधिकार दिला, आज त्याचमुळे महिला गावातील सरपंच तर देशातील राष्ट्रपती पद भूषवित आहे. कामगारांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक योजनांची निर्मिती केली आहे. ओबीसीसाठी संविधानात कलम ३४० नुसार आरक्षणाची तरतूद केली आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला संविधानातून समान कायदा, भाषण स्वतंत्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वतंत्र, लेखन स्वातंत्र्य दिले आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून राजा बनवला आहे. देश प्रजासत्ताक बनवला आहे. देशातील प्रत्येक नागरिकासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काम केले आहे. तरीपण काही जातीय मानसिकता असणारे जातीयवादी लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांसाठी कार्य केलं असा खोटा व खोडसाळ प्रचार करत असून अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रासाठी काय योगदान दिले आहे ते सांगितले पाहिजे असे परखड मत प्रसिद्ध स्तंभलेखक व राजकीय विश्लेषण दादाभाऊ अभंग यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त ठाणे येथे व्यक्त केले. धम्म मित्र मंडळ, शिवाई नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा. जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आयुष्यमान सतीश कांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वे कामगार युनियनचे नेते विद्याधर वाघमारे, कुंडलिक उरमोडे, माजी नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक, माजी नगरसेविका जयश्री डेव्हिड, भैय्यासाहेब इंदिसे, धवकल तायडे, भास्कर बैरीशेट्टी (शिवसेना शाखा शिवाई नगर), सौ. रागिनीताई बैरीशेट्टी (माजी नगरसेविका), समाजसेवक संदीप नटे आदी मान्यवर उपस्थित होते.
दादाभाऊ अभंग पुढे म्हणाले की, आज आपण आपल्या सांस्कृतिक प्रेरणा आणि प्रतिकांपासून दूर गेलो आहोत..बौद्ध लेण्यांवर इतर धर्मियांनी अतिक्रमण केले आहे तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभ याचा इतिहास सांगून त्यावर अतिक्रमण झाले आहे व हा न्यायालय लढा सुरू आहे या लढ्यात आपण सर्वांनी सामील व्हावे अशी विनंती उपस्थितांना केली.
अनेक मान्यवर उपस्थितीत होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्म मित्र मंडळाचे अध्यक्ष : सतीश कांबळे SEO, सचिव: नारायण पायल, उपाध्यक्ष: एस. एम. जाधव, उपसचिव: निर्मला आहेर, कोषाध्यक्ष: राजेंद्र पवार उपकोषाध्यक्ष: सुरेश पेटकर, प्रेमा गायकवाड, दिलीप जगताप, मिलिंद सोनावणे, साबळे काका, प्रभाकर सावंत, मोरे ताई, माणिक गायकवाड, अविनाश धुमाळे, अंकुश सुरेश जाधव, प्रदीप गायकवाड, प्रमोद खैरनार,वैशाली शिंदे, प्रमोद जाधव, जितू शिंदे, समाजसेविका सौ. टाक, भुजबळ ताई, अनिता ढाले, नयना साबळे यांच्यासह सर्व मंडळाचे आजी माजी पदाधिकारी आणि सभासदांनी प्रचंड मेहनत घेवुन कार्यक्रम यशस्वी केला.
धार्मिक कार्यक्रम बौद्धाचार्य विमलानंद गायकवाड यांनी पार पाडला. चंद्रकला ताई मुजमुले यांनी चांगले प्रवचन दिले. कार्यक्रमाचे आभार सचिव नारायण पायल यांनी मानले.
