मंचर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी….

Share

मंचर: आंबेगाव तालुका जयंती महोत्सव समिती
यांच्या विद्येमाने विश्वरत्न, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक व छत्रपती संभाजी महाराज चौक मंचर येते साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ज. वि. पवार (पँथर नेते,जेष्ठ साहित्यिक) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सन्मानिय अतिथी मा गौतमराव सोनवणे(आर पी आय सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य) व मा.आनंदराव खरात (रिपाई – गवई गट – मुंबई प्रदेश अध्यक्ष) यांना सन्मान चिन्ह देऊन, सत्कार करण्यात आला. मा गौतमजी खरात(युगप्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आंबेगाव), मा गौतमजी रोकडे(आं. ता. ज म समिती अध्यक्ष), मा गणेश कसबे(युवा नेते रिपाई), मा.आनंदराव साळवे(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवी मुंबई उपाध्यक्ष) मा सुनीलभाऊ देठे(समाजभूषण) इत्यादी अनेक क्षेत्रातून धार्मिक/सामाजिक/राजकीय कार्यकर्ते भीमजयंती मध्ये सामील होते. आंबेगाव तालुक्यातील सर्व भीम बांधवांनी आदरणीय मा ज.वि. पवार जेष्ठ साहितिक/जेष्ठ पँथर यांचे देखील सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *