डोंबिवली: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगात साजरी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजासाठी केलेला कार्य त्यांची विद्वत्ता यापुढे संपूर्ण जग नतमस्तक होत आहे. रिपब्लिकन सेना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी संघटना असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करून त्यांचे कार्य समाजातील प्रत्येक घटकांसाठी करीत राहील असे मनोगत रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी डोंबिवली येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
रविवार दिनांक १६/०४/२०२३ रोजी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे व भीमोत्सव २०२३ चे आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती व सभेचे अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर होते. मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य प्रमुख सागर डबरासे तसेच विशेष उपस्थिती म्हणून प्राध्यापक श्रीपती ढोले, बाळूभाऊ ओव्हाळ रिपब्लिकन वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हे होते. समता सैनिक दलातर्फे आद.संजय खराटे, गौतम सुतार ,गौतम खंदारे आदी सैनिकांनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांना मानवंदना दिली. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, निर्णायक एल्गार चे संपादक व भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग हे होते. प्राध्यापक श्रीपती ढोले व दादाभाऊ अभंग यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख आकर्षण म्हणून महाराष्ट्राचे हास्य जत्रेचे कलाकार , अभिनेते प्रभाकर मोरे , संदीप गायकवाड यांची उपस्थिती लाभली. तर महाराष्ट्राचे प्रसिद्ध असे पहाडी आवाजाचे गायक राजू बागुल आणि त्यांचा संच यांचा भीम बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बहुजनरत्न सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे मार्गदर्शनपर भाषण ऐकण्याकरिता रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी, तरुण-तरुणीनी, महिलांनी प्रचंड अशी गर्दी करण्यात आली होती. त्यामुळे सदर स्टेशन परिसर रोड, दिनदयाल चौक, डोंबिवली(प) येथून वाहतुकीसाठी जाणारा मार्ग हा बंद करण्यात आला होता. मान्यवरांचे भाषण झाल्यानंतर सभाध्यक्ष म्हणून सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. राजू बागुल आणि त्यांचा संच यांनी भिम बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक भारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच जल्लोष दिसून येत होता. सदर कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे प्रतिभाताई सागरी, अलका जगताप, उमा भारती, थॉमस शिनगारे, राहुलभाऊ जाधव, विक्रम खरे, दामोदर काऊतकर, लक्ष्मण खंदारे, बाबुराव नवसागरे, विजय खैरे, युवराज वाटूरे,कपिल सोनवणे,दीपक आहिरे,अंकुश साळवे सह कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी मधील प्रमुख कार्यकर्ते त्याचप्रमाणे कल्याण -डोंबिवली जिल्ह्याचे नेते व महाराष्ट्र रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव उघडे, दयानंद लोणे, भिमराव खंदारे, राम टेकाळे,साई धबाले, शैलेंद्र नेरकर, विकास खैरनार, मोहन टोंगराज सह आदी मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता (पँथर) आनंद नवसागरे (ठाणे जिल्हा निमंत्रक तथा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष,संस्थापक अध्यक्ष-दिनदयाळ चौक मित्र मंडळ),(समाजभूषण) राहुल भाऊ नवसागरे (डोंबिवली शहर विधानसभा अध्यक्ष), कुणाल नाईक रिपब्लिकन वाहतूक सेना डोंबिवली शहर अध्यक्ष, ज्ञानेश्वर खडसे (कल्याण डोंबिवली शहर संघटक),अरुण भाऊ शिरसाट (डोंबिवली शहर युवा अध्यक्ष),तुषार बनसोडे(डोंबिवली शहर युवा महासचिव),अर्जुन जाधव (डोंबिवली शहर उपाध्यक्ष),नितीन साबळे(शहर संघटक), संदीप हेरोडे(डोंबिवली शहर युवा संघटक), सुभाष शिरसाट (युवा विधानसभा अध्यक्ष), अनिल गवई(शहर संघटक), निलेश मोरे (उपाध्यक्ष),विजय पंडित (संघटक), परमेश्वर खिल्लारे(कोषाध्यक्ष), आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच राष्ट्रीय असंघटित कामगार संघटना विक्रांत मित्र मंडळ पंचशील मित्र मंडळ, खान्देश मित्र मंडळ,जय भीम मित्र मंडळ, टोकरभाई प्रतिष्ठान,भीम गर्जना मित्र मंडळ, भीमशक्ती मित्र मंडळ,सम्राट अशोक प्रतिष्ठान, डॅडी मोरे ग्रुप,दुर्गा पार्क रहिवासी संघ, संत रोहिदास मित्र मंडळ आदींनी उपस्थिती दर्शवली.
