येवला विधानसभा मतदारसंघात चुकीचा माणूस दिला म्हणून मी तुमची माफी मागायला आलोय……शरद पवार शरद पवारांच्यासाठी १९७८ पासूनची जुनी टीम मैदानात…बंडखोर आमदारांची भागनभाग..

Share

येवला: येवला विधानसभा निवडणुकीत मी चुकीचा उमेदवार दिला सहसा माझे निर्णय चुकत नसतात पण येवला मतदार संघाच्या बाबतीत माझा निर्णय चुकला या चुकीच्या निर्णयाचेही तुम्ही माझ्या बाजूने उभे राहिला परंतु माझा जो निर्णय चुकला त्याबद्दल मी तुमची माफी मागायला आलेलो आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यामध्ये सांगितले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची पहिलीच सभा ही नाशिकमधील येवल्यामध्ये झाली. मुंबईवरून येवल्यापर्यंत जात असताना असंख्य कार्यकर्त्यांनी शरद पवारांचं जागोजागी मोठं स्वागत केले. शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अशोक पवार, आमदार रोहित पवार यांच्यासह सर्वच आजी माजी आमदार या दौऱ्यात होते. सभेच्या सुरुवातीला शरद पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी येवल्यातील बाजार समितीच्या प्रांगणात हजारो कार्यकर्त्यांची तुफान गर्दी होती. यामध्ये तरुण कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. शरद पवार यांना येवल्यातील सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणांमधून सांगितलं की, तुम्ही भुजबळला उमेदवारी दिली आणि म्हणून आम्ही त्यांना निवडून देत होतो परंतु हे पार्सल आता येवल्यातून आम्ही माझगावला पाठवणार आहोत. समतेचा बुरखा पांघरून मनुवादी विचाराचा हा माणूस होता. तुम्ही आम्हाला समतावादी माणूस आहे असे सांगून दिला आम्ही तो स्वीकारला पण हा माणूस चुकीचा होता त्यांनी आमच्या येवल्यामध्ये जातीजातीमध्ये, धर्माधर्मांमध्ये विभागणी केली होती परंतु यापुढे येवल्या मधून छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी आणि त्यांनी यश बघितले असेल परंतु त्यांनी आता २०२४ ला अपयश बघावं अशा सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणांमधून सांगितलं. शरद पवार यांचे एकेकाळचे जुने सहकारी माजी आमदार, झेडपी सदस्य, पंचायत समितीचे सदस्य व पवारांचे पाठीराखे हे या सभेत उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी शरद पवारांना वचन दिले की या पुढील प्रत्येक लढ्यामध्ये आम्ही सामील असणार आहे. खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं की माझं वयाचा करता पण गडी किती खमक्या आहे. शरद पवार यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती यामध्ये तरुण आणि महिलांचा मोठा सहभाग होता. शरद पवार यांच्या या सभेनंतर अजित पवार बरोबर गेलेले जे आमदार आहेत त्यांचे चांगले धाबे दणाणले असून शरद पवार हे आता या आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करतील अशा प्रकारची सगळीकडे चर्चा चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *