(डोंबिवली) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षातर्फे मागील अनेक दिवसांपासून जनसामान्यांच्या समस्या, प्रश्न व त्यांना आवश्यक असणारी शासकीय मदत, शासकीय कागदपत्र यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. डोंबिवली पूर्व मध्यवर्ती शाखेत कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर व त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी आधार कार्ड शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक १४ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२३ पर्यंत ढापरे बिल्डिंग, , मानपाडा रोड, कस्तुरी प्लाझा जवळ, डोंबिवली पूर्व येथे केले आहे या शिबिरात नागरिकांच्या नावात बदल, जन्मतारीख बदल व पत्ता बदल अशा प्रकारची कामे सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत केली जाणार आहे. या शिबिराचा फायदा सर्व डोंबिवलीकर नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षातर्फे पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना व शिवसैनिकांनी केले आहे.
