गऊबाई लक्ष्मण अभंग यांचे दुःखद निधन…पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार दिनांक १३ऑगस्ट रोजी

Share

मुंबई: मुक्काम कळमोडी, तालुका खेड, जिल्हा पुणे या गावातील गऊबाई लक्ष्मण अभंग यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवार दिनांक ५/८/२०२३ रोजी सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे रात्री ११.१५ वा. दुःखद निधन झाले. गऊबाई अभंग यांची अंत्ययात्रा रविवार दिनांक ६/८/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता त्यांच्या राहत्या घरातून पंचशील बुद्ध विहार (घोडा गल्ली), डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कफ रेड, कुलाबा मुंबई न. ५ येथून निघाली व अंत्यविधी चंदनवाडी स्मशानभूमी, मरीन लाईन्स येथे धार्मिक पद्धतीने झाला. यावेळी अनेक मान्यवर, अभंग परिवारातील सर्व धम्म बांधव व भगिनींनी तसेच नातेवाईकांनी माता गऊबाई लक्ष्मण अभंग यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
गऊबाई लक्ष्मण अभंग यांना तीन मुलगे, एक मुलगी, तीन सूना,जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गऊबाई लक्ष्मण अभंग यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित केला असून या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती अभंग परिवाराने केली आहे.

कार्यक्रमाचे स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कफ रेड, कुलाबा, मुंबई ४००००५
टीप : बस न. १३८, मुंबई सी.एस. टी.रेल्वे स्टेशनवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर बस स्टॉप, कुलाबा

संपर्क: चंद्रकांत अभंग: 8828049943
नारायण अभंग:8468846623
विकास अभंग: 9930357625

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *