(कल्याण) कल्याण डोंबिवली – विठ्ठलवाडी – उल्हासनगर – अंबरनाथ येथील बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी…
सामाजिक ऐक्य परिषद यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली विठ्ठलवाडी उल्हासनगर अंबरनाथ येथील बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या एमआयडीसी या परप्रांतीयांनी वेढला असुन स्थानिक मराठी तरुण -पिढीला रोजगार नाही. आपल्या तरुणांची पण त्यामध्ये चूक आहे. ती चूक सुधारण्याची संधी सामाजिक ऐक्य परिषद यांच्या माध्यमातून आम्ही करून देत आहोत याचा लाभ नक्कीच बेरोजगारासाठी होणार आहे. जवळ जवळ १५० नामांकित कंपनी यामध्ये सहभागी होणार असून १५०० ते २००० तरुणांना रोजगार देण्याचा आम्ही संकल्प केला आहे. हा बेरोजगार मेळावा ऑक्टोंबर महिन्यात भरविण्यात येणार असुन वेगवेगळ्या पदाची भरती करण्यात येणार आहे असे सामाजिक ऐक्य परिषदेचे संस्थापक मिलिंद बेळमकर यांनी सांगितले आहे..
