सहकार मंत्री दिलीप वळसे – पाटील यांच्या विरोधात संपूर्ण राज्यभर संतापाची लाट…. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केली मुंबईत निदर्शने

Share

मुंबई: सत्तेचा अहंकार आल्यानंतर व सत्तेसाठी विचार बदलला की माणूस आपल्यावर एखाद्या व्यक्तीने केलेल्या उपकाराची परतफेड कशी करतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आहे.याला निव्वळ कृतघ्नता म्हणता येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई युवक प्रदेशाध्यक्ष ॲड. निलेश भोसले यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलीप वळसे पाटील यांना कृतघ्न माणूस असे संबोधले आहेत तर माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार यांनीही दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पीए म्हणून कार्यरत असलेले व मागील 35 वर्ष दिलीप वळसे पाटील यांना सत्तेची पदे दिली परंतु सत्तेच्या लाचारीसाठी दिलीप वळसे पाटील हे भाजप सारख्या आघाडीमध्ये गेल्यामुळे वळसे पाटील यांचा प्रतिगामी खरा चेहरा जनतेसमोर आलेला आहे. दिलीप वळसे पाटील हे सुरुवातीपासूनच प्रतिगामी विचारांचे असून केवळ सत्तेसाठी पुरोगामी विचारांचा बुरखा पांघरला होता परंतु ते आता त्यांच्या मूळ विचारधारेत गेल्यामुळे त्यांचा खरा चेहरा आज महाराष्ट्र बघत आहेत. शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांना सत्तेची अनेक पदे दिली परंतु त्यांनी त्या गोष्टीची जाणीव ठेवली नाही याउलट जो कृतघ्नपणा दाखवला आहे त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात दिलीप वळसे पाटील यांच्यावर सर्वसामान्य माणसांपासून तर नेत्यांपर्यंत टीका केली जात आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी टीका केली आहे तर काही नेत्यांच्या मते हे वळसे पाटील यांच्या तोंडी हे विधान घातले असले तरी या सर्व वादग्रस्त विधानाच्या पाठीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आहेत. ना.दिलीप वळसे पाटील यांनी जरी खुलासा केला असला तरी त्यांच्या मनात शरद पवार यांच्या विषयी जे विष होते ते बाहेर आले आहे…सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आंबेगाव ची जनता योग्य धडा शिकवतील असे विविध पक्षाच्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *