डोंबिवली: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कंपन्या असून या डोंबिवली एमआयडीसी मध्ये अनेक अनाधिकृत बांधकामे ही एमआयडीसीचे अधिकारी व भूमाफिया यांच्यामार्फत सुरू आहेत. बोगस कागदपत्रे बनवून अनेक भूमाफियांनी एमआयडीसीच्या जागेवर अनाधिकृत बांधकामे करून कब्जा केला आहे. दुकाने, इमारती, गोडाऊन, गॅरेज अशी अनाधिकृत बांधकामे झालेली आहेत. डोंबिवली एमआयडीसीत अनेक कंपन्यांनी त्यांना दिलेल्या जागेच्या क्षेत्रफळापैकी अनेक ठिकाणी कंपनीचे वाढीव बांधकाम केलेले असून यात कंपन्याच्या आजूबाजूला व टेरेसवर पत्रे टाकून त्याचा वापर व्यवसायासाठी करीत आहे. अशा प्रकारचे कंपन्यांनी आपल्या प्लॉटमध्ये अनाधिकृत बांधकामे केली आहेत. एमआयडीसीमध्ये एमआयडीसीच्या दुकानदारांनी आपल्याला दिलेल्या जागेच्या क्षेत्रफळापेक्षा अधिकचे अनाधिकृत बांधकाम करून दुकानांच्या वाढीव क्षेत्र तयार करून अनाधिकृत बांधकामे केली आहेत. तसेच अनाधिकृत दुकाने, टपऱ्या, छोटी-मोठी बांधकामे अशा प्रकारचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने येथे भूमापियांनी अनेक अनाधिकृत बांधकामे केली आहेत. खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून येथील एमआयडीसी जागा बळकावून अनाधिकृत बांधकामे केलेली आहेत तरी या सर्व अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांवर कारवाई करण्यात यावी व सर्व अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात यावी तसेच या अनधिकृत बांधकामाला मदत करणारे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच डोंबिवलीतील एमआयडीसी मधील अधिकारी माहिती अधिकाराखाली खोटी, अर्धवट व चुकीची माहिती देतात. अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपीलाची सुनावणी होऊन ही चार ते पाच महिने झाले तरी आदेश व माहिती देत नाही या सर्व अनागोंदी कारभाराची तक्रार मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, उद्योग प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे.
