टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांना समान न्याय देणार… वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.दत्तात्रय बोराटे

Share

(डोंबिवली) माझ्यासाठी काम महत्वाचे आहे ज्या नागरिकांवर अन्याय झाला आहे ज्याला न्याय मिळत नाही अशा पीडित लोकांना माझ्याकडे आणा त्यांना मी न्याय मिळवून देईल. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी टिळकनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी सक्षम आहे. या शहरात कुणावरही अन्याय होणार नाही. माझ्यासाठी सर्व नागरिक समान आहेत कुणावर ही मी अन्याय करणार नाही तर सर्वांना समान न्याय देईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.दत्तात्रय बोराटे यांनी आपल्या छोट्याशा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या. टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झाल्यानंतर टिळकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय बोराटे यांचा सत्कार टिळकनगर पोलीस स्टेशनमधील त्यांच्या कार्यालयात निर्णायक एल्गार चे संपादक व राजकीय विश्लेषक दादाभाऊ अभंग, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे नेते माणिकराव उघडे, करणी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष राणा शेठ, गौतम ढोके, सरिता रसाळ या सर्वांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय बोराटे यांचा सत्कार केला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *