डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांना समान न्याय देणार… वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.नितीन गीते

Share

(डोंबिवली) डोंबिवली हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर म्हणून गणले जात असून डोंबिवली मधील नागरिक हे अत्यंत सुसंस्कृत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी डोंबिवली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी सक्षम आहे. या शहरात कुणावरही अन्याय होणार नाही. माझ्यासाठी सर्व नागरिक समान आहेत कुणावर ही मी अन्याय करणार नाही तर सर्वांना समान न्याय देईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.नितीन गीते यांनी आपल्या छोट्याशा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या. डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झाल्यानंतर डोंबिवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.नितीन गीते यांचा सत्कार डोंबिवली पोलीस स्टेशन मधील त्यांच्या कार्यालयात निर्णायक एल्गार चे संपादक व राजकीय विश्लेषक दादाभाऊ अभंग, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे नेते माणिकराव उघडे, करणी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष राणा शेठ, महाराष्ट्र जनरल मजदुर युनियनचे अध्यक्ष लक्ष्मणराव मिसाळ, गौतम ढोके, लक्ष्मण पांडविर, माणिक काकडे, शेषराव शिंगणे, दीपक इंगळे, रिपब्लिकन टॅक्सी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पवार, माया मोरे व मंगल शेळके या सर्वांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन गीते यांचा सत्कार केला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *