कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त श्री प्रसाद बोरकर यांच्या कारवाईच्या आदेशाला सहाय्यक पालिका आयुक्तांनी केली कचऱ्याची डब्यात बोळवण….

Share

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम तसेच मनपाच्या जागेवर अतिक्रमण सुरू असून या अतिक्रमणाच्या विरोधात महापालिका आयुक्त यांना वारंवार पत्र देऊनही त्यावर कुठलीही कार्यवाही होत नाही. मनपा आयुक्त कार्यालयाकडून सहायक पालिका आयुक्त यांना कार्यवाहीसाठी पाठवलेले कार्यवाहीचे आदेश सर्व सहायक पालिका आयुक्त कचऱ्याच्या कुंडीत टाकून देतात. सर्व प्रभागातीलअनाधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे अधीक्षक त्यावर कुठलीही कार्यवाही करत नाही. महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयातून सहाय्यक पालिका आयुक्त यांना कार्यवाही साठी पाठवलेल्या अर्जावर कार्यवाहीची माहिती सबंधित प्रभाग क्षेत्रातील जन माहिती अधिकारी यांना माहिती अधिकाराखाली विचारल्यानंतर माहिती दिली जात नाही ग प्रभाग क्षेत्रात माहितीची अधिकाराखाली चार महिन्यापूर्वी सुनावणी झाली होती त्याचा आदेश व माहिती खोटी दिली याची तक्रार ग प्रभागाच्या सहाय्यक पालिका आयुक्त यांना केल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्ही थेट आयुक्तांना भेटा किंवा दुसरे अपील करा अशा प्रकारची उत्तर देऊन अनधिकृत बांधकामांचे समर्थन केले जाते. सबंधितांची तक्रार लोकायुक्त यांच्याकडे केली आहे. आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा असा आदेश सर्व प्रभाग क्षेत्र कार्यालयाला पाठवला असून या आयुक्तांच्या कार्यालयातून आलेल्या अर्जावर केलेल्या कार्यवाहीची माहिती ई प्रभाग क्षेत्र, ग प्रभाग क्षेत्र, क प्रभाग व ह प्रभाग क्षेत्र कार्यालयातील जन माहिती अधिकारी यांना माहिती अधिकाराखाली मागितली असता कुठलीही माहिती दिली नाही. अपील केले आहे तर त्या अपिलावर हे सहाय्यक पालिका आयुक्त सुनावणी सुद्धा घेत नाही इतका अनागोंदी कारभार कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयात सुरू आहे. एका प्रकरणात ग प्रभाग क्षेत्रात जन माहिती अधिकाऱ्यांनी इमारती संपूर्ण निष्कासित केल्या नाही पण माहिती देताना निष्कासित केल्या असे जन माहिती अधिकारी यांनी माहिती दिली असता ही चुकीची माहिती दिली असे सहाय्यक पालिका आयुक्त ग प्रभाग यांच्याकडे तक्रार केली असता ते सांगतात की आयुक्तांना भेटा किंवा दुसरे अपील माहिती आयुक्तांना करा. इमारत उभी असली तरी आम्ही त्याला निष्कासित म्हणतो असा अजब दावा केला आहे. सदर अधिकाऱ्याची तात्काळ तक्रार लोक आतुक्तांकडे केली असून अशा अधिकाऱ्यांमुळेच कल्याण डोंबिवली मनपा बदनाम होत आहे. महापालिकेच्या सहाय्यक पालिका आयुक्त तसेच अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे अधीक्षक कुठलीही कारवाई करीत नसल्याने या अंधाधुंद कारभारची चौकशी करून कारवाई करावी यासाठी मनपा अनाधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त श्री. प्रसाद बोरकर यांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती समजून सांगितली व सहाय्यक पालिका आयुक्तांची अनधिकृत बांधकामां संबंधातील उदासीनता निदर्शनास आणून दिल्यानंतर श्री. प्रसाद बोरकर यांनी सर्व प्रभाग क्षेत्र सहायक पालिका आयुक्त यांना कार्यवाहीसाठी आदेश दिले होते परंतु फ प्रभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त चंद्रकांत जगताप यांनीच केवळ पत्राचे उत्तर दिले असून बाकीच्या नऊ प्रभाग सहाय्यक पालिका आयुक्तांनी श्री.प्रसाद बोरकर यांचे आदेश फाट्यावर मारले आहेत. या नऊ प्रभाग सहाय्यक पालिका आयुक्तांची तक्रार लोकशाही दिनात आयुक्तांकडे मांडणार असून माहिती अधिकाराखाली खोटी माहिती देणारे व त्यांचे समर्थन करणाऱ्या सहाय्यक पालिका आयुक्तांची तक्रार लोकायुक्त यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *