मोहोळमध्ये वाघ परतताच लांडग्याची पळापळ… विकासाचा महामेरू रमेश कदम कम बॅक इन मोहोळ

Share

मोहोळ: मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि विकासाचा महामेरू रमेश कदम यांची आठ वर्षानंतर जामिनावर मुक्तता झाल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी मोहोळमध्ये परतताच त्यांचे मोहोळ मध्ये प्रचंड स्वागत झाले. हजारो कार्यकर्ते मोहोळच्या नगरीत अवतरल्यानंतर विरोधक यांचे धाबे दणाणले. माजी आमदार रमेश कदम यांना सुद्धा माहित नव्हते की इतके कार्यकर्ते आपल्या स्वागतासाठी येतील.आमदार रमेश कदम यांचे काम हे केवळ मोहोळमध्ये आहेच पण संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे माजी आमदार रमेश कदम तळागाळातला कार्यकर्ता व नेता आहे. अत्यंत निस्वार्थ कार्यकर्ता म्हणून त्यांची परिचित आहेत. क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. या आयोगावर त्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावागावात जाऊन त्यावेळी अत्यंत सूक्ष्मपणे मातंग समाजाच्या समस्यांचा अभ्यास करून सरकारला शिफारशी अहवाल व शिफारशी पाठवल्यावर त्यावर सरकारने चांगले निर्णय घेतले होते. मातंग समाजाच्या समस्या व प्रश्न यामुळे प्रकाशात आले होते व त्यावर मार्ग निघाला होता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात त्यांची चेअरमन म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी जे काम केलं ते अत्यंत उल्लेखनीय असलं तरी त्यांना अडचणी जाण्याचं काम केलं परंतु रमेश कदम हे लढाऊ कार्यकर्ते आहेत लढाऊ नेते आहेत त्यामुळे त्यांनी न डगमगता अत्यंत आठ वर्ष जेलमध्ये राहून संघर्ष केला सत्याचा विजय होईल असे ते आपल्या कार्यकर्त्यांना सांगत की आपल्याला न्याय मिळेल रमेश कदम यांचे मोहोळच्या नगरीत जे स्वागत झाले ते बघून २०२४ च्या निवडणुकीत रमेश कदम हे नक्कीच आमदार असतील यात तिळमात्र शंका नाही. माजी आमदार रमेश कदम हे मोहोळच्या जनतेच्या सेवेसाठी तत्पर असून त्यांचे मोहोळकर जनतेने प्रचंड स्वागत केले आहे. रमेश कदम यांच्यातला धडपड्या कार्यकर्ता, वैचारिक नेता आणि त्यांचे कार्यकर्त्यांचे संघटन कौशल्य यामुळे त्यांना अनेक पक्ष प्रवेशाच्या ऑफर देत असले तरी ते निष्ठावंत आहे अजून तरी त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही ते आहे त्याच पक्षात आहे माजी आमदार रमेश कदम यांची निष्ठावंत कार्यकर्ता व नेता अशी त्यांची ओळख असून रमेश कदम हे २०१९ ला मोहोळ मध्ये बाहेरून आलेलं पार्सल २०२४ मध्ये परत मोहोळकर मतदारसंघातील मतदारांच्या पाठिंब्याने परत पाठवतील अशा प्रकारची मोहोळ मध्ये कुजबुज सुरू आहे. माजी आमदार रमेश कदम विकासाचा महामेरू रमेश कदम यांच्यासारखा वाघ मोहोळ मध्ये परतल्यानंतर मोहोळ मधल्या काही लांडग्यांची पळापळ झाली आहे एवढं मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *