भारतीय संविधानाने राष्ट्रीय एकात्मता व अखंडता राखली… दादाभाऊ अभंग

Share

डोंबिवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे, अकरा महिने व अठरा दिवस रक्ताचे पाणी व दिवस रात्र मेहनत करून भारतीय संविधान लिहिले.भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व संविधान सभेच्या माध्यमातून भारतीय संविधानाची निर्मिती झाली. आपल्याला सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, न्याय,स्वातंत्र्य बंधुत्व दिले. भारतीय संविधानाने समता दिली. जात, धर्म, वं, लिंग आणि जन्मस्थान यावरून कोणताही भेदभाव करता येणार नाही याची हमी संविधानाने दिली. प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं. उपेक्षित वर्गाला राजकीय, शैक्षणिक व प्रशासकीय प्रतिनिधित्व मिळालं. अनेक जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, भौगोलिक विविध असणाऱ्या देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे काम भारतीय संविधानाने केलं. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आणि अशा संविधानाचा आपण सन्मान केला पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे व संविधान विरोधी कृत्य करणाऱ्या लोकांना रोखलं पाहिजे यासाठी संविधानाने दिलेल्या आपल्याला मतांचा अधिकारांचा आपण योग्य वापर केला पाहिजे व संविधानाच्या समर्थनार्थ असणाऱ्या लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे व संविधान विरोधी काम करणाऱ्या लोकांना आपण पराभूत केलं पाहिजे असे आवाहन निर्णायक एल्गार चे संपादक दादाभाऊ अभंग यांनी डोंबिवली येथे संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना केले. डोंबिवलीतील त्रिमूर्ती नगर येथे वाल्मिकी समाज हॉल या ठिकाणी भारतीय वाल्मिकी समाज सेवाभावी संस्था व जय वाल्मिकी मित्र मंडळ यांच्यावतीने संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष लक्ष्मणराव आंभोरे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाधव, जय वाल्मिकी मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप लोहरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे व भारतीय वाल्मिकी समाज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुरेश छापरवाल यांनी सांगितले की संविधान दिन आपण का साजरा केला पाहिजे व कशासाठी केला पाहिजे व संविधान दिनाचे महत्त्व काय आहे हे सविस्तर सांगितले.
धार्मिक विधी बौद्धाचार्य साहेबराव वाघ यांनी पार पाडला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य गौतम सुतार यांनी केले. कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी भारतीय वाल्मिकी समाज सेवाभावी संस्था व जय वाल्मिकी मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *