आपल्या सर्वांच्या साक्षीने जर लोकशाहीची तिरडी निघत असेल तर आम्ही लोकशाहीचे कैवारी नाही;… डॉ.श्रीपाल सबनीस… कल्याणमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिवादन कार्यक्रमात डॉ.श्रीपाल सबनिस व दादाभाऊ अभंग यांची व्याख्याने

Share

(आनंद गायकवाड,कल्याण )

कल्याण – देशातील महापुरुषांच्या विचारांमध्ये विषाची पेरणी करणारे कोण आहेत, कोणता धर्म आहे, कोणता राजकीय पक्ष आहे, हिंदू धर्मातील एक मैफिल विषाची पेरणी करत आहे हे शोधून हा समाज विघातक प्रकार कुठल्याही परिस्थितीत थांबला पाहिजे,आपल्या सर्वांच्या साक्षीने जर लोकशाहीची तिरडी निघत असेल तर आम्ही लोकशाहीचे कैवारी नाही असे परखड विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि साहित्यिक श्रीपाल सबनिस यांनी कल्याण पूर्वेतील एका कार्यक्रमात व्यक्त केले .

सुमारे १० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कल्याण पूर्वेतील डॉ . बाबासाहेब आंबेडकर अभिवाद समितीच्या विद्यमाने प्रभाग ड कार्यालयाच्या प्रांगणात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्व संध्येस अभिवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात साहित्यिक श्रीपाल सबनिस आणि स्तंभ लेखक विचारवंत दादाभाऊ अभंग या दोन वक्त्यांची डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाशझोत टाकणारी व्याख्याने झाली . ६ डिसेंबरच्या पूर्व संध्येस आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानात श्रीपाल सबनिस यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोन व्यक्तींच्या संबंधांवर भाष्य करतांना सांगितले की, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव गांधीच्या महात्म्यात गेला आणि गांधींचे महात्म्य विकसित होत गेले त्याच बरोबर गांधींच्या महात्म्याचा परिणाम आंबेडकरांवरही झाला म्हणूनच महात्मा गांधी आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे दोन्हीही महानच आहेत . विद्यमान राजकीय परिस्थितीवर नाराजी व्यक्त करतांना ते म्हणाले की, सुदृढ समाजासाठी बाबासाहेबांनी संविधानात ज्या सुदृढ समाजाचे चित्र कोरले होते तो समाज आज कुठे आहे? आपल्या साक्षीने जर लोकशाहीची तिरडी निघत असेल तर आम्ही लोकशाहीचे आणि बाबासाहेबांचेही खरे कैवारी नाहीत, महापुरुषांच्या विचारांमध्ये विष पेरणारांना वेळीच रोखले पाहिजे, बाबासाहेबांनी संपूर्ण मानवजातीत विष नव्हे तर अमृतच पेरले आहे असे ही ते म्हणाले .

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आज चाकरमान्यांना बोनस मिळत आहे, आपण डॉ . बाबासाहेब आंबेडकर समाजापुते मर्यादीत ठेवले आहेत,डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनातील दोन चार महत्वाच्या घटना सोडल्या तर आपण त्या पुढे जातच नाही, परंतु त्या पुढेही जावून आपण आंबेडकर समजुन घेतला पाहिजे, आंबेडकरांचे विचार हे अन्य जाती धर्मात जावूनही सांगितले पाहिजेत आणि पटवूनही दिले पाहिजेत असे विचार स्तंभ लेखक आणि विचारवंत दादाभाऊ अभंग यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले .

या दोन व्याख्यानांनंतर रात्री १२ चे सुमारास तथागात गौतम बुद्ध आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर भन्ते महेंद्र बोधी तसेच पंचशील भगिनी मंडळाच्या उपासिकांच्या सहभागाने त्रिसरण, पंचशील, धम्मवंदना घेण्यात आली . त्या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अनुक्रमे अभिवाद समितीचे सचिव सुबोध हुमणे, खजिनदार पराग मेंढे, आमदार गणपत गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड, अभिवाद समितीचे या वर्षीचे ओबीसी समाजाचे अध्यक्ष संजय गायकवाड हे प्रकृती अस्थावल्यामुळे उपस्थित न राहू शकल्याने यांचे प्रतिनिधी संजय शिर्के यांचे सह सुबोध भारत, भारत सोनवणे, अमित सोनावणे, अण्णा रोकडे, देवचंद अंबादे, अशोक भोसले, केतन रोकडे, राजु अंकुश, संजय मोरे, ए सी पी कल्याण घेटे यांनी पुष्पहार अर्पण करून डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन केले .

सुमारे ५ तास चाललेल्या या अभिवाद कार्यक्रमास कल्याण पूर्वेतील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष तसेच आंबेडकर समाजाचे उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *