डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासनाने सुट्टी जाहीर केल्याबद्दल मंत्रालयीन संघटनेने मानले शासनाचे आभार….

Share

        

     मुंबई: भारतीय संविधानाचे शिल्पकार  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे ०६ डिसेंबर रोजी मुंबईतील सर्व शासकीय कार्यालये सुरू असतात. परंतु या कार्यालयांना आता राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आंबेडकरी जनतेच्या संविधानवादी भारतीयांच्या तीव्र भावना लक्षात घेता मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक देखील शासनाकडून काढण्यात आले आहे.२०२३ या वर्षातील ही तिसरी सार्वजनिक सुट्टी सरकारकडून जाहीर करण्यात आल्याचेही या परिपत्रकातून सांगण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून अनु.जाती/जमाती/विजा-भज/इ. मा.व.वि.मा.प्र.(शासकीय-निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना.रजि) ह्या मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष मा.भारत वा.वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत होता.तसेच मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्र व्यवहार करत या संदर्भातील मागणी केली होती, अशी माहिती संघटनेचे मुंबई अध्यक्ष  मा.सुबोध भारत यांनी सांगितले.
 भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य ह्या देशातील जातीवाद दूर करण्यासाठी गरीब-दलित-आदिवासी-अल्पसंख्क -शोषित-पीडित-वंचित-सर्वहारा समूहाच्या उत्थानासाठी तसेच मागासवर्गीयांच्या विकासासाठी, भारतीयांच्या न्याय अधिकारांसाठी आणि समस्त भारतीयांच्या हितासाठी समर्पित केले.त्यामुळे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून लाखोंच्या / करोडोंच्या संख्येने भीम अनुयायी चैत्यभूमी येथे दाखल होत असतात. तसेच या दिनाचे औचित्य साधून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा समता आणि न्यायाचा विचार घेऊन राज्यासह मुंबईच्या अनेक भागांत विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभागी होतात. मात्र, या दिवशी मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, आस्थापना सुरू असल्याने या कार्यालयांत काम करणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन करणे शक्य होत नाही, असे अनु.जाती/जमाती/विजा-भज/इ. मा.व/वि. मा.प्र.(शासकीय-निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना.रजि) ह्या संघटनेच्या पत्रात नमूद केले होते.
       राज्यात ०६ डिसेंबरला सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी अनुसूचित जाती-जमाती शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना तसेच राज्यातील अनेक संघटनांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने देखील या दिवशी मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबतची शिफारस शासनाला केली होती. त्याचा विचार करून तसेच आणि आंबेडकरी जनतेच्या भावनांची त्वरित दखल घेऊन या दिवशी मुंबईतील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी आग्रही मागणीही डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस मा.नागसेन कांबळे यांनी त्यांच्या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती. 
सहा डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या बाबत मंत्रालयीन संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या अप्पर मुख्य सचिव ग्रह श्रीमती सुजाता सोनिक मॅडम यांचे आभार व्यक्त करताना मुंबई अध्यक्ष सुबोध भारत, सहसचिव लक्ष्मीकांत ढोके व सुभाष गवई उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *