कोरेगाव भीमा ऐतिहासिक जयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढा…येत्या रविवारी वाशीनाका (चेंबूर)मध्ये जनजागृती अभियान….

Share

मुंबई : १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमा येथे ब्रिटिश आणि पेशवे यांच्यात युद्ध झाले व या युद्धात जुलमी, अन्यायी पेशवाईचा अंत झाला. १ जानेवारी १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शौर्याचे प्रतिक असणाऱ्या भिमा कोरेगाव येथील जयस्तंभाला मानवंदना देऊन आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा गौरव केला होता. या युद्धाचे स्मरण म्हणून कोरेगाव भीमा येथे जो जयस्तंभ बांधण्यात आला होता तिथे रखवालदार म्हणून माळवदकर नावाची व्यक्ती ठेवण्यात आली होती. याच माळवदकर कुटुंबाने ऐतिहासिक जयस्तंभ आणि जयस्तंभ परिसरातील जागेवर अतिक्रमण केले असून त्या अतिक्रमणाच्या विरोधात भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग समितीच्या माध्यमातून न्यायालय लढाई लढत आहे. ही न्यायालयीन लढाई अत्यंत व्यवस्थित सुरू असताना ज्यांनी अतिक्रमण केलं आहे त्या माळवदकर कुटुंबातील एका सदस्यानी काही दिवसांपूर्वी जयस्तंभ आमची खाजगी मालमत्ता आहे अशा प्रकारचे विधान केले होते तर भीमा कोरेगांव येथे लढाई झाली नाही तर चकमक झाली होती असे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे पुस्तक काही वर्षापूर्वी लिहिले आहे. माळवदकर कुटुंबाच्या या कृत्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. कोरेगाव भीमा येथे लढाई झाली की नाही? जयस्तंभ नेमका कुणाचा? १ जानेवारीला जयस्तंभ परिसरात प्रवेश करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी का घ्यावी लागते? हा न्यायालयीन खटला काय आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनी व मानखुर्द येथील आंबेडकरी अनुयायांनी भीमा कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढा लढणारे दादाभाऊ अभंग यांचे व्याख्यान ठेवलं होते. ही दोन्ही व्याख्याने आंबेडकरी चळवळीतील अत्यंत तळमळीचे कार्यकर्ते चेंबूर वाशीनाका येथील रहिवाशी महावीर कांबळे यांनी ही सर्व माहिती आमच्या विभागातील समाज बांधवांना समजावी म्हणून त्यांनी विनंती केली त्यांच्या विनंतीचा मान देऊन येत्या रविवारी दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी वैशाली बुद्ध विहार, कुकरेजा वसाहत, नागाबाबा नगर, वाशीनाका, मुंबई ४०००७४ येथे सायंकाळी ६.३० वाजता कोरेगाव भीमा जयस्तंभ अतिक्रमण व संविधानिक न्यायालयीन लढा या विषयावर भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांचे व्याख्यान आयोजित केले असून आपल्या सर्वांच्या अस्मितेचा व गंभीर हा विषय समजून घेण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महावीर कांबळे, प्रभाकर धनवे उत्तम चोपडे, श्रीकांत जगताप, अविनाश काजळे, मुकुंद लोंढे, कैलास देहाडे, सन्नी कांबळे, संदीप मोरे, आनंद केदारे, बबन लोंढे, अशोक काळे, महेंद्र कांबळे, कुंदन कांबळे, परशुराम गडांकुश, विद्यानंद डावरे, राजू जोगदंड, अजय बोराडे, दादू सोनवणे, बाळकृष्ण मोरे, प्रितेश कांबळे, श्रीकांत लोंढे, विक्रम कांबळे, निखिल कांबळे आणि सर्व चेंबूर वाशीनाका मधील पुरुष आणि महिला सामाजिक कार्यकर्ते यांनी आयोजन केले आहे . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील या लढ्यासाठी मैदानात उतरलेले चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनी मधील युवा कार्यकर्ते तृषभ आव्हाड, जयेंद्र गायकवाड, आकाश किरतकर, सुमेध गरुड, राज त्रिभुवन, सुनील खैरनार, सामाजिक कार्यकर्ते मोहन सोनवणे हे मेहनत घेत आहे. वाशी नाका चेंबूर या परिसरातील सर्व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते महावीर कांबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *