पूर्वजांच्या शौर्याचं प्रतीक असलेल्या ऐतिहासिक जयस्तंभाचे संरक्षण व जतन करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी… मिलिंद अवसरमोल

Share

मानखुर्द (मुंबई ): कोरेगाव -भीमा येथे १ जानेवारी १८१८ मध्ये युद्ध झालं आणि या युद्धात जुल्मी , अत्याचारी पेशवाईचा शेवट झाला. या युद्धाचं स्मरण राहावं म्हणून कोरेगाव भीमा येथे ब्रिटिश सरकारने शौर्याचे प्रतिक म्हणून जयस्तंभ हे स्मारक बांधण्यात आले. पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या स्मारकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी १ जानेवारी १९२७ आली भेट देऊन जयस्तंभाला मानवंदना देऊन त्यांच्या शौर्याचा गौरव करून सांगितलं होते की, हे शौर्याचे प्रतीक असलेला ऐतिहासिक जयस्तंभ आपले ऊर्जा आणि प्रेरणा स्थान असून आपले पूर्वज लढाऊ आणि शुर होते हा ऐतिहासिक पुरावा आहे. आपण लढाऊ पूर्वजांचे वारसदार आहोत असे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या ऐतिहासिक भाषणात सांगितले होते. पण याच भीमा कोरेगाव जयस्तंभ आणि जयस्तंभ परिसरात रखवालदार माळवदकर कुटुंबाने अतिक्रमण केले असल्यामुळे त्या अतिक्रमण विरोधात भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीच्या माध्यमातून प्रशासकीय व न्यायालय लढा दादाभाऊ अभंग लढत असून आपण त्यांना सर्वांनी साथ द्यावी व पूर्वजांच्या शौर्याचे प्रतिक असलेल्या जयस्तंभाचे संरक्षण व जतन करावे असे आवाहन या न्यायालयीन लढाईत सुरुवातीपासूनचे आधारस्तंभ असलेले आंबेडकरी चळवळीचे विचारवंत, अमेरिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे आंबेडकरराईट इंटरनॅशनल मिशन चे आयु. मिलिंद अवसरमोल यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. खंडीझोड होते.
मानखुर्द येथील विश्वभूषण बुद्ध विहारांमध्ये भीमा कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण संविधानात्मक न्यायालय लढा या जनजागृती अभियान कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभी पंचशील घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रमुख आयोजक मोहन सोनवणे यांनी केले. या जनजागृती अभियानामध्ये भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी शिवशाही, पेशवाई, भीमा कोरेगावच्या लढाईचा इतिहास, भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढाई तसेच पुढील भूमिका काय असावी याविषयी सखोल असं मार्गदर्शन केले. तसेच या न्यायालय लढाईमध्ये आंबेडकरी समाजातील सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. कामगार नेते प्रकाश लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून आंबेडकरी चळवळीतील लढाऊ नेत्या सरिताताई चंद्रकांत कांबळे (नेरूळ) उपस्थित होत्या. कार्यक्रमास मोहन सोनवणे, आनंद चंदनशिवे, बाजीराव कांबळे, दिनकर गवारे, दादा उघडे, नामदेव सरवदे, सुधाकर पारखे, राजू सुरवाडे, सुनील अभंग, स्मिता सुनील अभंग, आशाताई खंदारे,अनिताताई सावंत, नेहा कांबळे मान्यवर उपस्थित होते, या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत म्हणून महावीर कांबळे, तृषभ आव्हाड, जयेंद्र गायकवाड, सुमेध गरुड, आकाश किरतकर , राज त्रिभुवन, सुनील खैरनार या सिद्धार्थ कॉलनीतील तरुणांनी विशेष मेहनत घेऊन उपस्थिती दाखवली. कार्यक्रमाचे आभार आयोजक मोहन सोनवणे यांनी मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *