अंबरनाथमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन मोठ्या उत्साहात साजरा….

Share

अंबरनाथ :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी प्रतापसिंह महाराज भोसले हायस्कूल,सातारा या ७ नोव्हेंबर १९०० मध्ये प्रवेश घेतला होता या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून अंबरनाथमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव मंडळ, सर्वाजनिक बुध्द जयंती महोत्सव मंडळ, अंबरनाथ, आणि भारतीय बौद्ध महासभा, अंबरनाथ मधील बौद्ध समाजातील सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्था यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शालेय प्रवेशदिन अंबरनाथ नगर परिषदेच्या प्रांगणातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा येथे मोठ्या उत्साहाने ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धार्मिक विधी करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार डॉ. बालाजी किणीकर, निर्णायक एल्गार चे संपादक दादाभाऊ अभंग, माजी नगरसेवक धनंजय सुर्वे, युवा उद्योजक सुमेध भवार, बी.बी. मडीखांबे, पी.एस.खरात, कडलाग गुरुजी, एम.पी. सपकाळे, पी.एस थोरात, अंकिताताई भोईर, भास्कर बोराळे यांनी या ऐतिहासिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भरत टपाल, संतोष पगारे, राजेश खिल्लारे,किरण कांबळे, इंद्रपाल कांबळे, विशाल माघाडे, नागेश साळवी, जयश्री गोडांबे, सीमा गायकवाड, बनसोडे गुरुजी व उपासक उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पगारे यांनी केले व आभार भरत टपाल यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *