अतुल देशमुख यांच्या समर्थकांची निर्धार सभा… अतुल देशमुख यांच्या भूमिकेकडे मतदारांचे लक्ष

Share

खेड: खेड -आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून इच्छुक असलेले आणि मागील सहा महिने मतदारसंघ पिंजून काढणारे अतुल देशमुख यांना उमेदवारी मिळाली नाही. ही जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाकडे गेल्याने अतुल देशमुख यांना उमेदवारी मिळाली नाही. मुळात अतुल देशमुख यांनाच उमेदवारी मिळेल अशा प्रकारची खेड आळंदी विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होती. शेवटपर्यंत अतुल देशमुख यांचेच नाव चर्चेत होते. सर्व सर्वे अतुल देशमुख यांच्याच बाजूने होते. इच्छूक पक्षातील स्थानिक नेत्यांनी, इच्छुक उमेदवारांनी व नुरा कुस्ती खेळणाऱ्या काही मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे तक्रार केली की अतुल देशमुख यांना उमेदवारी देऊ नका ते खतरनाक आहे, अत्यंत डेंजर आहे त्यामुळे अतुल देशमुख यांची उमेदवारी कापण्यात आली. अशी मतदारसंघामध्ये चर्चा सुरू आहे. त्यातच दोन सासरे आणि दोन जावयांचा खेळ सुद्धा अतुल देशमुख यांना उमेदवारी मिळण्यात अडसर ठरला. मुळात अतुल देशमुख यांनी यापूर्वी जाहीर केले होते की उमेदवारी ज्या पक्षाला जाईल त्या पक्षाचं प्रमाणिकपणे काम करायचे परंतु इच्छूक उमेदवार व नूरा कुस्ती खेळणाऱ्या लोकांनी अतुल देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडे चुकीच्या मार्गाने तक्रार करून उमेदवारी कापल्याने अतुल देशमुख हे प्रचंड नाराज झाले असून त्यांनी त्याच नाराजीतून उमेदवारी अर्ज भरला आहे. अतुल देशमुख हे उमेदवारी अर्ज भरणार नव्हते पण त्यांचे हजारों समर्थकांनी अतुल देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरावा असा दबाव टाकला. अतुल देशमुख हे कुठलाही निर्णय स्वतः घेत नाही त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते जो निर्णय घेतात तो अतुल देशमुख मान्य करतात. अतुल देशमुख यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची निर्धार सभा शनिवार दिनांक २ नोव्हेंबर २०२४ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती खेड येथे दुपारी ३.०० वाजता होणार असून अतुल देशमुख निवडणूक लढणार ही निवडणूकीतून माघार घेणार याकडे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागले असून अतुल देशमुख यांच्या भूमिकेवर आमदार कोण होणार हे सुद्धा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *