लातूर : दि.२० डिसेंबर २०२४ रोजी लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने दिनदर्शिका विमोचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या शुभहस्ते लातूर जिल्हा वकील मंडळ लातूर च्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले आहे यावेळी दीनदर्शिके कडे केवळ मुहूर्त, दिनांक, वृत्त्वैकल्ये पाहण्यासाठीच नव्हे तर सकारात्मक संधी म्हणून पहावे असे विचार व्यक्त केले आहेत. रोजचा प्रत्येक येणारा दिवस हा विधिज्ञा बरोबरच ,पक्षकारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो त्यामुळे वेळ न घालवता आपल्या पक्षकारास स्पिडी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे.न्याय व्यवस्थेला सक्षम ठेवण्याचे काम विधीज्ञानी केले असल्याचे विचार यावेळी व्यक्त केले आहेत
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अँड अण्णाराव पाटील सदस्य महाराष्ट्र व गोवा वकील परिषद मुंबई, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री व्हीं व्ही पाटील, जिल्हा सरकारी अभियोक्ता संतोष देशपांडे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड शरद इंगळे उपस्थित होते तर मंचावर उपाध्यक्ष अँड मनीषा दिवे पाटील, सचिव अँड प्रदिपसिंह गंगणे, सहसचिव अँड नरेश कुलकर्णी,अँड तृप्ती इटकरी ग्रंथालय सचिव अँड विजय साबळे आदी उपस्थित होते यावेळी अँड अण्णाराव पाटील, प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्हि व्हि पाटील यांनी दिनदर्शिका विमोचन कार्यक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
या कार्यक्रमास लातूर जिल्हा वकील मंडळातील ज्येष्ठ विधीज्ञ माधवराव इंगळे, अँड व्यकटराव बेंद्रे, अँड पुरुषोत्तम नावंदर, अँड उदय गवारे, अँड विवेक वावरे, अँड विजय जाधव, अँड जयश्रीताई पाटील, अँड मेघा पाटणकर, अँड हर्षला जोशी,अँड शिल्पा शहादपुरी, अँड स्वाती केंद्रे, अँड अभिलाषा गवारे आदींसह मोठया संख्येने उपस्थिती होतीकार्यक्रमांचे सूत्रसंचालन अँड रोहित सोमवंशी यांनी केले तर प्रास्ताविक,आभार अँड नरेश कुलकर्णी यांनी मांडले आहे
