एम.एस. लॉ कॉलेज,(मुंब्रा) येथे मराठी भाषा गौरव दिन जोशपूर्ण साजरा….

Share

(ठाणे) मराठी भाषा ही महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे. यात जात, धर्म,पंथ व प्रांत न बघता महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी माणूस हा मराठी भाषिक आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी मराठी भाषेचे संवर्धन केलं पाहिजे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे ती अधिकाधिक बोलली पाहिजे आणि या भाषेची महती इतरांनाही सांगितली पाहिजे मराठी ही आपली मायबोली आहे म्हणून मराठी भाषेचे संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे अशा प्रकारचं आवाहन एम.एस. लॉ कॉलेजच्या सर्व मान्यवरांनी मराठी भाषा गौरव दिन २०२५ या कार्यक्रमांमध्ये केले.
एम.एस.लॉ कॉलेज,(मुंब्रा) येथे मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने स्पर्धात्मक विचार मांडण्यात आले. यात दादाभाऊ अभंग, मजरखान पठाण, वृंदा नंबियार, नूरअफशा, दीपिका जैस्वाल, सुधाकर सावंत यांनी मराठी भाषेची माहिती सांगणारी स्पर्धात्मक विचार मांडले. ज्युरी म्हणून प्रा.मीनाक्षी डोंगरे व प्रा. प्रणिता कांबळे यांनी काम पाहिले व त्यांनी निरपेक्ष असा निकाल दिला. विजेत्या सुधाकर सावंत, दादाभाऊ अभंग व मजरखान पठाण यांना प्रा. जमान फातिमा रिझवी, प्रा. अब्दुल्ला मोमीन व प्रा. जितेश मोटवानी यांनी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे जोशपूर्ण गीत विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगले सादर केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी प्रा.मीनाक्षी डोंगरे यांनी कुसुमाग्रज यांची कविता सादर करून कुसुमाग्रज यांच्या आठवणींना उजाळा दिला तर प्रा प्रणिता कांबळे यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवन कार्याचा गौरव केला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून एम. एस. लॉ कॉलेज (मुंब्रा) प्रिन्सिपल हुसेन अली सर उपस्थित होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. मीनाक्षी डोंगरे, प्रा.प्रणिता कांबळे, प्रा. अब्दुल्ला मोमीन, प्रा. जमान फातिमा रिझवी, प्रा.स्वाती तटकरे, प्रा.स्मिता नागवेकर, प्रा.जितेश मोटवानी प्रा. अंजना नायर, प्रा. नुजहत शेख उपस्थित होते. कार्यक्रमांचे अत्यंत खुमासदार सूत्रसंचालन प्रा. स्वाती तटकरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन प्रा. जमान फातिमा रिझवी व प्रा. अब्दुल्ला मोमीन यांनी केले होते. हा कार्यक्रम सर्व विद्यार्थांनी यशस्वीरित्या पार पडला अखेर राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *