महापुरुषांच्या जयंती उत्सवानिमित्त दादाभाऊ अभंग यांचे बदलापूर मध्ये जाहीर व्याख्यान

Share

बदलापूर: चलो बुद्ध की ओर संघाच्यावतीने आपल्या सर्व आदर्श महापुरुषांची संयुक्त जयंतीचा समारंभ रविवार दि. १८ मे रोजी सायंकाळी ६.०० वाजता भारत कॉलेजच्या पाठीमागे, श्रावस्ती बुद्ध विहार, घोरपडे चौक, हेंद्रे पाडा, बदलापूर (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रमुख वक्ते मान. दादाभाऊ अभंग ( आंबेडकर चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत, सुप्रसिध्द स्तंभलेखक,पत्रकार , संपादक निर्णायक एल्गार, महाराष्ट्र अध्यक्ष :- कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती ). विषय :– डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक क्रांती व त्यांचे राष्ट्रीय योगदान ह्या विषयांवर मान दादाभाऊ अभंग आपले परखड विचार मांडणार आहेत. मान. डॉ. डी.के.सोनावणे सर ज्येष्ठ विचारवंत, माजी न्यायधीश, कायदेविषयक मोफत सल्लागार
समारंभाचे अध्यक्ष आयु. वाय. आर.लोंढे समारंभाचे स्वागताध्यक्ष शांताराम कदम, भास्कर सोनावणे आंबेडकरवादी सुप्रसिध्द कवी गायक, राष्ट्रीय प्रबोधकार, मास्टर राजरत्न राजगुरू साहेब यांच्या मनोरंजनातून प्रबोधन बुद्ध,फुले,शाहू,आंबेडकर या आपल्या आदर्श महापुरुषांच्या विचारधारेवर आधारीत जल्लोषपूर्ण गीत गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच आंबेडकर चळवळीतील सुप्रसिध्द कवी मान. मधुकर गायकवाड व त्यांचे सहकारी कवी, कवीयत्री मित्रवर्ग हे आपल्या दर्जेदार कविता सादर करणार आहेत. सदर प्रसंगी समाजातील ८ वी ते १२ वी पर्यंतच्या हुशार,होतकरू विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होणार आहे. बदलापूर मधील तमाम जनतेला अन् बौद्ध उपासक, उपासिका, महिला मंडळ, जयंती उत्सव मंडळ यांनी कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे ही विनंती. अत्यंत महत्वपूर्ण सूचना आहे की, चलो बुद्ध की ओर संघाच्या सर्व आंबेडकरवादी सभासदांनी आपल्या संपुर्ण परिवारासहित, नातेवाईक, मित्र मंडळीसह१८ मे रोजी होणाऱ्या संयुक्त जयंतीच्या समारंभास उपस्थित राहावे ही विनंती.
आपले आंबेडकरवादी बंधू, वाय. आर.लोंढे प्रमुख संयोजक, संयोजक:- शांताराम कदम, भास्कर सोनावणे, विलास काकडे, सहसंयोजक:– काशीनाथ भालेराव, विष्णू साबळे ,विनायक अडांगळे, मास्टर राजरत्न राजगुरू, डॉ. प्रदीप बर्जे, बंडू धेंडे, बाजीराव बोर्डे,एल. डी. भद्रे. तसेच चलो बुद्ध की ओर संघाचे सर्व मान्यवर सभासद ऑडिटर :– भगवान मोरे, धीरज फुलझेले चलो बुद्ध की ओर संघाचे सर्व मान्यवर सभासद, हितचिंतक, आंबेडकरवादी कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभेचे बदलापूर सर्व शाखेतील व शहर कार्यकारणीचे पदाधिकारी, सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *