मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या ठाणे जिल्हा संघटक या पदावर आयु. मजरखान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत व सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. आयु. मजरखान पाटण हे जनतेच्या समस्या घेऊन प्रशासनाकडे जाऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. विविध सामाजिक संस्थेतून त्यांनी समाजोपयोगी कामे केली आहे. आयु. मजरखान पठाण हे कायद्याचे शिक्षण घेत असून वकील झाल्यावर भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढाई ताकदीने ते न्यायालयात मोफत लढणार आहेत. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते मागील काही वर्षांपासून सहभागी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. मजरखान पठाण जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
