कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे शहापूर तालुका अध्यक्ष संतोष कर्डक यांचा रिपाइं (आठवले) पक्षातर्फे जाहीर सत्कार….शहापूर मधील धम्म बांधवांनी या ऐतिहासिक न्यायालयीन लढ्यात सामील व्हावे…संतोष कर्डक

Share

शहापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहापूर तालुका अध्यक्ष मा जयवंत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मा सुहास भाई जगताप (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष) मा बाळकृष्ण गायकवाड मामा
(महाराष्ट्र प्रदेश सहसचिव) मा बबनदादा गायकवाड (शहापूर तालुका सचिव) ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ प्रतिभा कांबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २८/५/२०२५ रोजी शहापूर शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीमध्ये कसारा विभाग सचिव मा संतोष भाऊ कर्डक यांची कोरेगाव भिमा जयस्तंभ बचाव समितीचे संस्थापक अध्यक्ष मा दादाभाऊ अभंग यांनी शहापूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केल्याबद्दल मिटींग मध्ये उपस्थित असलेल्या शहापूर तालुक्यातील सर्व रिपाइं पदाधिकार्याच्या उपस्थिती मध्ये मा संतोष भाऊ कर्डक यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व २४ मे या तारखेला त्यांचा वाढदिवस होता आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांचा वाढदिवस शहापूर येथे शासकीय विश्रामगृह येथे सर्व रिपाइं पदाधिकार्याच्या उपस्थित मध्ये खुप मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ ही आपली अस्मिता व आपल्या पूर्वजांचे शौर्याचे प्रतीक असून या न्यायालयीन लढ्यात आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) शहापूर तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व या लढ्यात सामील आहोत असे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व न्यायालयीन लढा हा कुठल्या एका व्यक्तीचा, संघटनेचा किंवा पक्षाचा नसून आपल्या समाजाचा सामूहिक लढा आहे या लढ्यात आपण सर्वांनी सामील व्हावे व भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात शहापूर तालुका अग्रेसर राहावा व आपण या ऐतिहासिक न्यायालयीन लढ्यात खारीचा वाटा उचलू या असे शहापूर तालुका अध्यक्ष संतोष कर्डक यांनी सांगून लवकरच भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढा हे जनजागृती अभियान संपूर्ण शहापूर तालुक्यात राबविणार आहोत असे कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे शहापूर तालुका अध्यक्ष संतोष कर्डक यांनी सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *