.
मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या जिंतूर तालुका अध्यक्ष या पदावर आयु. रत्नदीप शेजवळे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत. आयु. रत्नदीप शेजवळे यांनी १७ स्वाभिमानी बौद्ध परिषदा आयोजित करून मागील १२ वर्षात ५०० तरुणांना श्रामनेर दिक्षा दिली. पाच हजार लोकांची २०० किमी दहा दिवस धम्म पद यात्रा काढून संपूर्ण जिंतूर तालुक्यात संविधान जागृती अभियान त्यांनी राबविले. BS4 सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गाव तिथे बारा पौर्णिमा साजऱ्या करण्याचे काम केले. जिंतूर तालुक्यातील वीस गावांना मोफत बुद्ध मूर्ती भेट देण्यात आल्या. अन्याय अत्याचार विरोधात शेकडो आंदोलने , मोर्चे काढून सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला. सर्व सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून वैचारिक प्रबोधनाचे काम करीत आहे. महापुरुषांच्या विचारधारा समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी ते सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करतात तसेच ते विविध सोशल मीडियाच्या चॅनेलवरून जनतेचे प्रश्न शासकीय स्तरावर मांडून ते सोडविण्याचे काम करतात. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते मागील काही वर्षापासून सक्रिय सहभागी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. रत्नदीप शेजवळे जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
