मुंबई: सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतील एकनिष्ठ व प्रमाणिक कार्यकर्ते श्री. राजाराम (राजू) तुळशीराम अहिरे ( मूळ गाव: मुक्काम गोवले,तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड) यांचे आज दिनांक २५/६/२०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचे अंत्यदर्शन सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत २०१, बी विंग, गोपाळ हाईट, स्टेशन रोड, गावदेवी बदलापूर (पूर्व) येथे घेता येईल त्यांच्यावर अंत्यसंस्कार आज सायंकाळी ६.०० वाजता मांजरली स्मशानभूमी, बदलापूर (पश्चिम) येथे होणार आहे.
राजू अहिरे हे आंबेडकरी चळवळीतील अत्यंत प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची चेंबूर मध्ये ओळख होती. ते त्यांच्या शालेय जीवनात प्रागतिक विद्यार्थी संघ या संस्थेशी जोडले होते. याच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. महापुरुषांची विचारधारा आत्मसात केल्यानंतर शेवटपर्यंत ते आंबेडकरी चळवळीशी प्रामाणिक राहिले. यानंतर त्यांनी बहुजन समाज पक्ष माजी अध्यक्ष विलास गरुड यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले. माजी अध्यक्ष विलास गरुड यांचे ते अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी म्हणून गणले जात होते. राजू अहिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची विचारधारा आयुष्यभर आत्मसात केल्याने ते या विचारधारेशी प्रामाणिक राहिले. त्यांनी आपल्या सामाजिक कार्यात विद्यार्थ्यांना प्रवेश साठी सहकार्य, कुठल्याही गरजूंना मदत तसेच लोकांना जी गरज लागेल ते काम ते करीत होते. संयमी स्वभाव, शांत आणि सगळ्यांशी मैत्रीची भावना त्यांच्याकडे असल्याने ते अजातशत्रू होते. त्यांच्या पश्चात पत्नी सारिका, मुलगी रुचिका व मुलगा अथर्व तसेच भाऊ, भावजय, पुतणे व त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे.
संपर्क
दिनेश अहिरे: 8169487647
दिपक अहिरे:9325121986
सुजय अहिरे:9004177920
