भीमा कोरेगाव विजयस्तंभ न्यायालयीन लढ्यात सर्वांनी सामील व्हावे ….. दादाभाऊ अभंग

Share

मुरबाड: भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ व विजयस्तंभाच्या परिसरातील जागेवर अतिक्रमण झालेले असून या अतिक्रमणाच्या प्रशासकीय व न्यायालय लढाईत सर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे कारण ही न्यायालय लढाई आपल्या अस्मितेची असून ती लढणे आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे म्हणून सर्वांनी तन मन आणि धन देऊन या न्यायालय लढाईत सहभागी व्हा असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी मुरबाड येथील शासकीय विश्राम गृहात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या बैठकीत मुरबाड मधील झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
मुरबाड येथील शासकीय विश्रामगृहात शनिवार दिनांक २८ जून २०२५ रोजी पदाधिकारी नियुक्तीची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत दादाभाऊ अभंग यांनी भीमा कोरेगावचा इतिहास, भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरात झालेले अतिक्रमण तसेच या अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय व न्यायालय लढाई याची सर्व उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांना विस्तृतपणे सांगून ही न्यायालयीन लढाई आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि ही न्यायालयीन लढाई जिंकल्याशिबाय भीमा कोरेगाव जयस्तंभ आणि परिसराचा विकास होणार नाही न्यायालय प्रकरण सुरू असल्याने भीमा कोरेगाव व परिसरातील विकास कशा प्रकारचा खोळंबला आहे याची सविस्तर माहिती दिली. भीमा कोरेगावची न्यायालय लढाई एका पक्षाची एका व्यक्तीची एका संघटनेची एका संस्थेची नाही तरी प्रत्येक प्रत्येक व्यक्तीची स्वतःची लढाई आहे आपल्या पूर्वजांनी मिळवलेल्या विजयाचे प्रतीक असलेला विजयस्तंभ व त्याचा परिसरात अतिक्रमण झालेले आहे आणि प्रत्येक वर्षी १ जानेवारीला शौर्यदिनाच्या कार्यक्रमाची मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते ही अत्यंत आपल्या समाजासाठी खेदजनक बाब असून हा न्यायालय लढा सर्वांनी जर एकत्र येऊन लढला आणि लोक लढा झाला तर भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ अतिक्रमण मुक्त होईल अशा प्रकारचं दादाभाऊ आपण यांनी सांगितलं. ही बैठक आंबेडकरी चळवळीचे क्रियाशील कार्यकर्ते दिलीप धनगर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या मुरबाड तालुका अध्यक्षपदी दिलीप धनगर व मुरबाड तालुका प्रभारी पदी महेंद्र धनगर यांची नियुक्ती जाहीर केली उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून त्यांच्या नियुक्तीचं स्वागत केलं यावेळी अनेकांनी महेंद्र धनगर आणि दिलीप धनगर यांचे अभिनंदन करून या दोघांच्या नेतृत्वाखाली मुरबाड मध्ये आम्ही भिमा कोरेगावच्या अतिक्रमणाच्या न्यायालय लढाईत सर्व प्रकारची मदत करू. आम्हाला पद महत्वाचे नाही तर आपल्या अस्मितेचा लढा महत्वाचा आहे अशा अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात रवि देसले, रवि चंदने, दिनेश उघडे, भाऊ रातांबे, राजेश पवार, विजय खोळंबे, रमेश देसले, नरेश मोरे, जितू पंडित, ऍडव्होकेट शरद थोरात, भगवान उबाळे, प्रकाश भाकरे, बाळकृष्ण टोहके, सुभाष टोहके, बाळकृष्ण बुधाजी टोहके, ऍडव्होकेट मदन थोरात, विलास खंडागळे, राजू चंदने, वसंत मुकणे, संजय खोळंबे, हरिश्चंद्र चंदने, प्रकाश भवार, आदि सामाजिक, राजकीय धार्मिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन उघडे यांनी अत्यंत सुंदर केले तर आभार महेंद्र धनगर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *