सामाजिक कार्यकर्ते सुनिलभाऊ देठे यांचा ५९ वा. वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न…

Share


मुंबई : जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक सुनिलभाऊ देठे यांचा ५९ वा. वाढदिवस दिनांक ४/७/२०२५ रोजी त्यांचे कुटुंब, मित्र परिवारसामाजिक कार्यकर्ते सुनिलभाऊ देठे यांचा ५९ वा. वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न… यांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संयुक्त माझगाव बौध्द विकास तथा सामाजिक विकास संघटनेचे अध्यक्ष आयु. यशवंत ओव्हाळ व लव्हलेन सार्वजनिक जयंती महोसत्व समितीचे सह सचिव आयु . संदीप शिंदे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच सुनील देठे यांच्या पत्नी सौ. भारतीताई सुनील देठे यांचा देखील सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी सुनील देठे यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सुनीलभाऊ देठे यांनी सोशल मीडियावरून,फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले व यापुढे असेच प्रेम असू द्या अशी सर्व मित्र, नातेवाईक यांना विनंती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *