मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या ईशान्य मुंबई जिल्हा संघटक या पदावर आयु. राजेंद्र विष्णू वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत. आयु. राज विष्णू वाघमारे हे आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक आंदोलनात तसेच स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर काम करीत असून ते अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी होतात. महापुरुषांच्या विचारधारा समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी ते विविध सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करतात. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते मागील काही वर्षापासून सक्रिय सहभागी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. राज विष्णू वाघमारे जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
