कोरेगाव भीमा जयस्तंम बचाव समितीची घाटकोपर पूर्व तालुका कार्यकारणातील काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर…काही दिवसांत संपूर्ण कार्यकारिणी जाहीर करणार…कुणाल अरुण बागुल

Share

मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क ही प्रशासकीय व न्यायालय लढा जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती अभियान सुरू केलेले असून त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा व तालुका स्तरावर या समितीची बांधणी सुरू केली आहे घाटकोपर पूर्व तालुका येथे पदाधिकारी नियुक्तीची बैठक रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी घेण्यात आली त्या बैठकीत कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या पदाधिकारी यांची घोषणा करण्यात आली.
या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आयु. रमेशजी थोरात, आयु.प्रमोदजी गांगुर्डे (सामाजिक कार्यकर्ते), कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे ईशान्य मुंबई उपाध्यक्ष आयु. धम्मदिप भाऊ बनसोडे, आयु. राजेंद्र भाऊ वाघमारे ( ईशान्य मुंबई जिल्हा संघटक), आयु.नंदू भाऊ साठे (सामाजिक कार्यकर्ते, आयु.शेखर अण्णा गायकवाड (सामाजिक कार्यकर्त),आदी उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते घाटकोपर तालुका (पूर्व) नियुक्त्या पुढील प्रमाणे करण्यात आल्या आहेत त्यात मा.सागर भाऊ गायकवाड (उपाध्यक्ष), मा.उमेश भाऊ गांगुर्डे. (उपाध्यक्ष), मा.प्रदीप भाऊ साळवे (सरचिटणीस), मा.सुमितभाऊ थोरात (संघटक) या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत घाटकोपर तालुका (पूर्व) कार्यकारणी व तालुक्यात सर्व वॉर्ड अध्यक्षांची नियुक्ती केली जाणार असून आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभ ही आमची अस्मिता असून हे शौर्याचे प्रतिक वाचवण्यासाठी या लढ्यात आम्ही आता सगळे उतरलो आहोत आपण पण सर्वांनी सामील व्हा असे आवाहन घाटकोपर तालुका पूर्व अध्यक्ष कुणाल अरुण बागुल यांनी बैठकीत सर्वांना आवाहन केले. काही दिवसांत स्नेहाताई उमेश गांगुर्डे (घाटकोपर पूर्व महिला अध्यक्ष) यांची महिला तालुका कार्यकारणी व महिला वॉर्ड अध्यक्ष नियुक्त केले जाणार आहे..भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा दादाभाऊ अभंग लढत असून हा लढा प्रत्येक आंबेडकरी वस्त्यांत व घराघरात घेवून जाणार आहोत असे कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे घाटकोपर तालुका (पूर्व) अध्यक्ष कुणाल अरुण बागुल व घाटकोपर तालुका पूर्व (महिला) अध्यक्ष आयु. स्नेहाताई उमेश गांगुर्डे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *