मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे.भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या कल्याण शहर महासचिव या पदावर राजू रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत काम करीत आहे. आयु. राजू रोकडे हे राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती मुंबई (सुपर कॉर्डनेटर), बुद्धभूमी फाउंडेशन अशोक नगर वालधुनी कल्याण, (सभासद) बुद्ध पौर्णिमा कल्याण पूर्व व पश्चिम 2024 (अध्यक्ष) समता फेरी 2024 (खजिनदार) सम्यक सामाजिक प्रतिष्ठान कल्याण संस्थापक अध्यक्ष, डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समता फेरी 2024 ( खजिनदार) अशा विविध पदावर काम केले आहे व सध्या करीत आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते मागील काही दिवसांपासून सहभागी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. राजू रोकडे जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
