भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालय लढ्याला सर्वतोपरी सहकार्य करणार…ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अण्णासाहेब रोकडे

Share

कल्याण: आमच्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ असून आज तो अतिक्रमणीत आहे. या विजयस्तंभाची देखरेख करण्यासाठी ठेवण्यात आलेल्याच एका व्यक्तीने अतिक्रमण केले असून या अतिक्रमणाविरोधात अनेक वर्षापासून भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग हे प्रशासकीय व न्यायालय लढाई लढत असून त्यांच्या या लढाईसाठी मी माझा पक्ष व माझ्याशी संबंधित सर्व संघटना व संस्थेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करणार अशा प्रकारचा ठाम विश्वास जेष्ठ रिपब्लिकन नेते व पॅंथर अण्णासाहेब रोकडे यांनी कल्याण येथे केले.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व न्यायालयीन लढा या विषयावर कल्याण मध्ये एक बैठक झाली या बैठकीत अतिक्रमण व न्यायालयीन लढा ही सर्व माहिती दादाभाऊ अभंग यांनी उपस्थितीत मान्यवरांना दिली. सर्वांनी या लढ्यात आम्ही उतरणार आहोत व आमच्या पूर्वजांचा शौर्याचा विजयस्तंभ वाचवणार आहोत असे सांगितले. यानंतर महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिल्याबद्दल दादाभाऊ अभंग यांचा सत्कार आण्णासाहेब रोकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व मंत्रालय अधिकारी सुबोध भारत, कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक केतन रोकडे, कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अशोक भोसले, कल्याण शहर महासचिव राजू रोकडे व कोरेगाव भिमा जयस्तंभ बचाव समितीचे हितचिंतक कमलताई इंगोले, आशाताई तिरपुडे, पराग मेंढे, राहुल कासारे, भरत शेठ जाधव, कुशल निकाळे, सुनील शेंडे सर, विजय पवार व प्रथमेश पवार उपस्थित होते. अण्णासाहेब रोकडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सत्कार केल्याबद्दल व कोरेगाव भीमा जयस्तंभ अतिक्रमण व न्यायालय लढ्याला सहकार्य करणार असल्याबद्दल दादाभाऊ अभंग यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *