एम.एस. लॉ कॉलेजच्या (मुंब्रा) प्रा. डॉ.जमान फातिमा रिझवी यांना संशोधनात्मक डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल एस.वाय.एल.एल.बी. वर्गांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार…

Share

( मुंब्रा): एम. एस. लॉ.कॉलेजच्या प्रा. डॉ. जमान फातिमा रिझवी मॅडम यांना Amity University या विद्यापीठातून संशोधनात्मक डॉक्टरेट ही पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा एम.एस. लॉ (मुंब्रा) कॉलेजचे प्रिन्सिपल मा. हुसेनअली सर यांच्या मार्गदर्शनाखाली एस. वाय. एल. एल. बी या वर्गाच्यावतीने महाराष्ट्राचे प्रसिद्ध स्तंभलेखक,राजकीय विश्लेषक व जेष्ठ पत्रकार दादाभाऊ अभंग यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी एम. एस. लॉ कॉलेजच्या प्रा. मीनाक्षी डोंगरे मॅडम, प्रा. प्रणिता कांबळे मॅडम, प्रा. नुजहद शेख मॅडम व प्रा. मारिया डीमटीमकर मॅडम व एस.वाय.एल. एल. बी. तसेच बी.एस.एल.एल. एल. बी. विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अत्यंत खुमासदार सूत्रसंचालन संतोष जामधरे व रशिदा यांनी केले.
प्रा.डॉ. जमान फातिमा रिझवी यांचा सर्व प्राध्यापक व विद्यार्थांनी प्रचंड टाळ्या वाजवून सत्कार केल्यानंतर त्या अत्यंत भावूक झाल्या त्यांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली व सर्वांचे आभार मानले. त्यांनी त्या विषयाची निवड का केली व हा विषय आज का महत्वाचा आहे या विषयी थोडक्यात माहिती दिली.
प्रा. डॉ. जमान फातिमा रिझवी यांचा An Evaluative Study Of Matrimonial Crutety in India with special reference to Thane City of Maharashtra हा पी.एच.डी. साठी संशोधनात्मक विषय होता. या विषयाचा मराठीत अर्थ ’भारतातील वैवाहिक क्रूरतेचा चिकित्सक अभ्यास: महाराष्ट्र राज्यातील ठाणे शहराच्या विशेष संदर्भसहित’ असा आहे. हा विषय कायदा, समाजशास्त्र व स्री अभ्यास या तिन्ही क्षेत्राशी संबंधित आहे. भारतामध्ये विवाह केवळ सामाजिक नसून ती एक पवित्र संस्था मानली जाते मात्र या संस्थेमध्ये काही वेळा पती-पत्नी पैकी एकाकडून दुसऱ्याविरुद्ध क्रूर वर्तन ( Matrimonial Crutety) केले जाते. वैवाहिक क्रूरता म्हणजे शारीरिक अत्याचार, मारहाण, दुखापत, मानसिक छळ, अपमान, धमकावणे, एकमेकांविषयी संशय घेणे, संवाद न ठेवणे, आर्थिक छळ, उपजीविकेचे साधन न पुरवणे, हुंडा मागणे, लैंगिक छळ किंवा जबरदस्ती अशी अनेक कारणे असली तरी भारतीय न्याय संहितामध्ये अनेक कायदे असून याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करता येते. अनेक कायदे बनविले असले तरी अजून ही वैवाहिक पती पत्नी न्यायापासून वंचित आहे. प्रा. डॉ. रिझवी मॅडम यांनी वैवाहिक क्रूरता या बाबतीत अत्यंत संवेदनशील व मार्गदर्शनपर व पुढील अनेक पिढ्याना याचा फायदा होईल असा संशोधनात्मक प्रबंध लिहिला असून त्यांनी महाराष्ट्रातील ठाणे शहर याचा विशेष संदर्भ घेतलेला आहे. ठाणे शहराचे वेगाने शहरीकरण होत असल्याने शहरी जीवनशैली, रोजगार, आर्थिक दबाव, कुटुंबसंस्था यामुळे वैवाहिक वादाची संख्या वाढताना दिसते. ठाण्यातील कौटुंबिक न्यायालय, महिला तक्रार कक्ष, पोलीस नोंदी यामधून वैवाहिक क्रूरतेची स्वरूपे, कारणे व परिणाम आपल्याला दिसून येतात. अशा अत्यंत महत्त्वपूर्ण संवेदनशील विषयावर ज्यात कायदा, समाजशास्त्र आणि स्री अभ्यास यांचा समन्वय साधून प्रा. डॉ. जमान फातिमा रिझवी मॅडम यांनी अत्यंत मेहनतीने केलेलं संशोधन, त्यांनी त्याचा केलेला सखोल अभ्यास त्यांच्या या अभ्यासाची, कष्टाची व कार्याची दखल घेऊन एस. वाय.एल. एल. बी कॉलेजचे प्रिन्सिपल हुसेनसली सर, सर्व प्राध्यापक वर्ग, सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी प्रा डॉ. जमान फातिमा रिझवी मॅडमचे कौतुक करून त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक व दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी एस. वाय. एल. एल. बी च्या विद्यार्थ्यांसाठी रोजची दैनंदिन माहिती (अपडेट) न थकता देणारे विद्यार्थी प्रिय व Gang Of M.S. College 2024 _ 2025 या Whats app ग्रुपचे Admin मजरखान पठाण यांचा सर्व प्राध्यापक यांच्या हस्ते विशेष सत्कार विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *