चेंबूर: आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक असलेला भीमा कोरेगावचा जयस्तंभ हा अतिक्रमणित असून जयस्तंभच्या जागेचा व जयस्तंभाच्या मालकीचा लढा सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. प्रशासकीय व न्यायालयीन लढा आपण प्रत्येकानी आपला स्वतःचा लढा समजून लढला पाहिजे जर आपण हा न्यायालयीन लढा संघटितपणे लढलो तर आपला विजय नक्कीच होईल. प्रत्येकाने या लढ्यात सहभागी झाले पाहिजे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. हा लढा समाजाभिमुख करण्यासाठी या लढ्याची जनजागृती होणे अपेक्षित आहे. आपल्या तालुक्यात, शहरात व जिल्ह्यात जनजागृती अभियान राबविले पाहिजे यासाठी या लढ्यात सामील व्हा असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी चेंबूर येथे केले. कोरेगाव भीमा जयस्तंभ अतिक्रमण व सद्यस्थिती या विषयावर जाहीर व्याख्यान मंगळावर दिनांक २ जून २०२६ रोजी विपस्सना बुद्ध विहार, सिद्धार्थ कॉलनी चेंबूर येथे संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष समितीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष समाजभूषण संजय धावारे होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना अभिवादन करून धम्म वंदना घेऊन करण्यात आली. धार्मिक विधी बौद्धाचार्य भरत गायकवाड गुरूजी यांनी पार पाडला. कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे मुंबई सचिव विलास काळे यांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण या विषयावरील अत्यंत जोषपूर्ण गीत गाऊन सर्वांच्या मनात स्फूर्ती भरली. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण प्रशासकीय व न्यायालयीन विषयावर लढा या विषयावर दादाभाऊ अभंग यांनी सर्व पुराव्यांसह सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी बबन सरवदे, कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक भरत टपाल, मुंबई उपाध्यक्ष विलास काळे, ईशान्य मुंबई सरचिटणीस धम्मदीप बनसोडे, अणुशक्ती नगर तालुका अध्यक्ष महावीर कांबळे, कल्याण पूर्व तालुका अध्यक्ष विशाल म्हस्के, घाटकोपर पूर्व तालुका अध्यक्ष कुणाल बागुल, घाटकोपर तालुका उपाध्यक्ष अनिल चंदनशिवे, घाटकोपर तालुका संघटक सुमित थोरात, अणुशक्ती तालुका सरचिटणीस गौतम कांबळे, अणुशक्ती तालुका उपाध्यक्ष राजेश सकपाळ, सुनील यादव, संदीप अवघडे, सुनील अभंग, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेंबूर तालुका अध्यक्ष जयेंद्र गायकवाड, दक्षिण मध्य मुंबई संघटक तृषभ आव्हाड,चेंबूर तालुका सरचिटणीस भगवान कांबळे, चेंबूर तालुका सचिव सुमेध गरुड, चेंबूर तालुका सचिव सुनील खैरनार, चेंबूर तालुका सह प्रवीण बेंगळे, शरद पवार, राज त्रिभुवन, जितेंद्र घोलप, सौरभ गांगुर्डे, निलेश अहिरे, अतुल जाधव, संतोष केदार, गुरुजी, मानव ढोणे गुरुजी यांनी प्रचंड मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश भुजबळ यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुंबई प्रदेश अध्यक्ष समाजभूषण संजय धावारे यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांनी सर्वाना या अस्मितेच्या न्यायालयीन लढ्यात सामील होण्याचे आवाहन केले. अल्पोहराची व्यवस्था आयु. प्रवीण बेंगळे यांनी केली होती.
