संविधानामुळे महिलांना समता आणि स्वातंत्र्य मिळाले….अदिती अभंग

Share

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्क मध्ये वस्त्रोद्योगातील हजारो महिला कामगारांनी रूटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस व कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. या दोन मागण्या बरोबर लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री – पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी जोरदार मागणीही केली. अमेरिकेतील महिला कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा ‘ जागतिक महिला दिन ‘ म्हणून स्वीकारावा असा ठराव संमत केला.
तर भारतात हिंदू कोड बिलपूर्वी सर्व धर्मीय स्त्री ही बंदिस्त होती. तर ऋग्वेदात मुलीचा जन्म होणं ही दुःखदायी, स्त्रीचं वर्णन हे मनोरंजनकारी आणि भोग्यारुपात आहे. अर्थवेदात हे म्हटलं गेलं आहे की जगातल्या सर्व महिला शूद्र आहेत. तिला कुठलाच अधिकार नव्हता. जन्मापासून तिच्या मृत्युपर्यंत पुरुषांच्याच निगराणीखाली राहिली. ही बाब डॉ. बाबासाहेबांना लक्षात आल्यानंतर त्यांनी संविधान निर्मितीच्या वेळेस म्हणजे ते सन १९४६ मध्ये स्त्री ही शिक्षण आणि अर्थार्जन करण्यासाठी मुक्त झाली पाहिजेत. एवढेच नाही तर कौटुंबिक वादातून तिची मुक्तता करणे आवश्यक होते. नवरा मृत्यू पावल्यानंतर सतीसारख्या वाईट प्रवृतीला खो देण्यासाठी व महिलांना त्याचा फटका बसु नये या परंपरा खंडित करण्यासाठी व स्त्रीला पुरुषांबरोबर समान दर्जाचे जीवन जगता यावे, तिला शिक्षण घेता यावे, स्वतःचे अर्थार्जन, नोकरी करता यावी म्हणून हिंदू कोड बिल आणले. याच हिंदू कोड बिलानुसार आज तमाम भारत देशातील महिला ही ताठ मानेने जगत आहे.
हिंदू कोडबीलामध्ये चार कायदे अंमलात आणले हिंदू कोड बिलमध्ये पुरुषांबरोबर स्त्रीलाही समान दर्जा मिळाला पाहिजे. वडीलाच्या संपत्तीमध्ये वारसा हक्कानुसार भावाबरोबरीचा हक्क दिला पाहिजे. या बाबी त्या बिलामध्ये समाविष्ठ असल्याने आज स्त्री ही सक्षम झाली आहे. एवढेच नाही तर त्या बिलात चार कायदे आणले. ते कायदे असे की, हिंदू मॅरेज ॲक्ट १९५०, दत्तक व उदरभरण कायदा, हिंदू वारसा कायदा, पालकत्व आणि मायनॉरिटी कायदा या कायद्यामुळे महिला खऱ्या अर्थाने सक्षम झाल्या. मुलाबरोबर तिला आपल्या पालकांच्या संपत्तीमध्ये किंवा वारसा हक्कांमध्ये सर्व अधिकार प्राप्त झाले. हिंदू कोडबीलामुळे देशातील सर्वोच्च पदावर महिला आहेत. महिलांसाठी उद्धारकर्ते म्हणून महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे योगदान दिले ते कदापी महिलांसाठी न विसरणारे आहे. मनुस्मृतीच्या अध्याय नऊमधील श्लोक १८ मध्ये स्त्रीला शिक्षणाचा हक्क नाकारला होता. परंतु तो शिक्षणाचा हक्क हिंदू कोड बिल मध्ये बाबासाहेबांनी महिलांसाठी आणला आणि आज देशाच्या सर्वोच्च पदावर जसे की राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान इंदिरा गांधी, पोलिस अधिकारी किरण बेदी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जयललिता, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व सध्याच्या केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण व सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यासह आदी महिला देशाच्या महत्त्वाच्या पदावर राहून गेल्या असून काही कार्यरत आहेत.
देशातील तमाम सर्वधर्मीय महिला वर्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आत्मसात करण्याची गरज आहे. बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करुन आणि त्यांचे विचार आत्मसात करणे हाच खऱ्या अर्थाने ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यासारखे आहे. महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

अदिती अभंग
सह संपादक
निर्णायक एल्गार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *