अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे अंधेरीत मेगा शिबीर संपन्न

Share

मुंबई : दिनांक १०.३.२०२३ रोजी अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने अंधेरी पूर्व भाजप कार्यालयात आयुष्यमान भारत हेल्थ कार्डाचे मेगा शिबीर आयोजित केले होते.

स्थानिकांनी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून आली.एकूण ५५१ जण लाभार्थी ठरले व त्यांना अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे विनामूल्य सेवा प्रदान करण्यात आली. भाजपच्या माजी नगरसेविका संध्या यादव यांच्या विनंतीला मान देत अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने आभा कार्डाचे शिबीर आयोजित करून समाजातील दुर्बल घटकांना निशुल्क सेवा दिली.
केंद्र शासनाच्या या आभा कार्डात लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित असते व क्यूआर कोड स्कॅन केल्याने पुन्हा प्राप्त करण्यात येते. तसेच वी. ए. मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी सेवा लाभार्थ्यांना देण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु असलेला आभा प्रकल्प अतिशय उपयुक्त आहे व समाजातील सर्व घटकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा”
सदर शिबीर फौंडेशनचे जनसंपर्क अधिकारी श्री विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *