बिकानेर मध्ये वर्ल्ड कॉन्फरन्स ला सुर्यकांत देवराम पारधे यांना ग्लोबल ह्युमिनिटी चेंज मेकर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित

Share

बिकानेर: राष्ट्रहित फाउंडेशन आणि ह्युम्युनिटी वेल्फेअर सोसायटी च्या सहकार्याने 2 दिवसीय 11 , 12 मार्च 2023 ला आंतरराष्ट्रीय संवाद परिषदेचे बिकानेर राजस्थान आयोजन करण्यात आले होते. तसेच यामध्ये सुर्यकांत पारधे अध्यक्ष, भारती फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांना कारगिल योद्धा नायक दीपचंद जी सर तसेच कर्नल हेलसिंग शेखावत यांच्या हस्ते ग्लोबल ह्युमिनिटी चेंज मेकर अवॉर्ड सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला बिकानेर चे आयुक्त माननीय नीरज कुमार जी तसेच कारगिल युद्ध नायक दीपचंद सरजी करणार हेलसिंग आदरणीय मेवासिंग ,सुचित्रा अहिरे उपस्थितीत होते. या ट्रेनिंग मध्ये नेत्रदान ,अंगदान ,रक्तदान तसेच मिल्क बँक याविषयी सर्व ट्रेनिंग देण्यात आले या ट्रेनिंग साठी देश तसेच विदेशातील समन्वयक उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना माननीय सुर्यकांत पारधे बोलले की हा पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून भारती फाउंडेशन मधील सर्व पदाधिकारी, रक्तदाते ,आयोजक तसेच वेळोवेळी मदत करणाऱ्या बँक यांचा आहे अशी माहिती भारती फाऊडेशन सचिव सचिन साळवी यांनी दिली. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डोंबिवलीतील सर्व सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, पारधे यांचे कुटुंब, मित्र परिवार व निर्णायक एल्गार चे संपादक दादाभाऊ अभंग यांनी सूर्यकांत पारधे यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *