आमचा संघर्ष प्रस्थापित सत्ताधारी आणि माजलेल्या शोषण करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात….मिलिंदभाई सुर्वे

Share

मुंबई: पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॕफ महाराष्ट्र (PRPM) च्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि.12 मार्च 2023 ला घाटकोपर येथिल गंधकुटी बुद्ध विहाराच्या सभागृहामध्ये संघर्ष मेळावा संपन्न झाला. मेळाव्यामध्ये हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भिमशाहिर मा.अशोकजी निकाळजे यांचा गायनाचा मनोरंजक कार्यक्रम संपन्न झाला.उपस्थितांनी त्या प्रबोधनाचा मनमुराद आस्वाद घेतला.त्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.पँथर मिलिंदभाई सुर्वे हे होते.सुत्रसंचलन मुंबई प्रदेशचे अध्यक्ष मा.मंगेशजी पगारे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष राज्याचे उपाध्यक्ष मा.अशोकजी तांबे,शशिकांतजी शिंदे,आणि मा.रोहिदासजी वाघमारे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पक्षाचे राज्य महासचिव तथा सरचिठणीस प्रा.डॉ.उमेश पवार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडताना पक्ष का स्थापन करण्यात आला याचे कारण सांगितले.त्यामध्ये जुन्या पक्षिय कामामध्ये स्वार्थ,एकाधिकारशाही, मनमानीचे असणारे धोरण याला कंटाळून आणि चमचेगिरीने रसातळाला नेण्याचा जो प्रयत्न चालू होता त्या गोष्टींचा त्याग करुन.निष्ठापुर्वक आणि लोकशाही मार्गाने पक्षाचे काम चालवण्यासाठी आणि जरी पक्षाला कोणताही चेहरा नसेल नेतृत्वाचा पण पक्ष हा विचारांच्या माध्यमातून सत्यता मांडून सत्ता किंवा संपत्तीच्या हव्यासासाठी स्थापन न करता सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष करुन सामाजिक परिवर्तन आणि व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी पक्षाची स्थापना करण्यात आली आहे तसेच पक्ष 9मार्च 2022 साली स्थापन करण्याचे कारण म्हणजे 9 मार्च 1924 साली विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेचे स्थापना केली होती त्याला 98 वर्षे पुर्ण होत असतानाच आमच्या या पक्षाची स्थापना केलेली आहे आणि 2024 साली शंभर वर्षे पुर्ण होत असताना कदाचित पक्षाचा निवडणुकीमध्येही आपले उमेदवार विजयी होऊन पक्ष आपले खाते ओपन करेल असे वक्तव्ये केले.तसेच एका वर्षामध्ये पक्षाने मुंबई प्रदेश मधिल सहा जिल्हे परिपुर्ण बांधलेले आहेत तसेच महाराष्ट्र राज्यातिल सहा जिल्हे बांधून झालेले आहेत 2023 च्या शेवटापर्यंत राज्यातिल सर्वच जिल्ह्यामध्ये आपला पक्ष पोहचलेला असेल.आज पक्षाला एक वर्षे पुर्ण झाले असुन उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.पक्ष तमाम sc,st,obc,nt,and minority समुदायाला सोबत घेवुन काम करत असताना यासर्व समुहाचे पदाधिकारी हे आपल्या प्रमुख पदांवरती काम करत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.हा पक्ष मुळ पक्ष रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया च्या खुल्या पत्राला उद्देशून आपले काम करत आहे.कोण्या एका समाज समुहाचा अथवा व्यक्ती चा मालकीहक् नराहता लोकशाहीच्या विचारानुसार विचार हाच विचारांचा वारसदार यातत्वाने पक्षाचे काम चालू राहिल असे वक्तव्य करत असताना चळवळीच्या झालेल्या दशेस कारणीभुत असणारी संस्कृती गाढून दिशा मिळवण्याच्या मार्गाने ध्येय धोरण आखलेली आहेत ती अस्तित्वात आणण्यासाठी आपण सार्वांनी प्रयत्न करुया असे सांगितले .तसेच कार्यक्रमाला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मा.महेशजी साळुंखे तसेच मा.विजयजी धोत्रे हे सुद्धा उपस्थित होते त्या दोघांनीही आपल्या संघर्षमय वाटचालीमध्ये आम्ही सामिल होऊन आपल्या समवेत आहोत आसे सांगितले.कार्यक्रमामध्ये पुणे जिल्ह्यातून मा.रामदासजी ताठे साहेब हे आवर्जुन आपल्या सहकार्यांसमवेत उपस्थित राहिले.त्यासर्व मंडळीने पक्षामध्ये प्रवेश केला त्या सर्व बंधू भगिनींचा सन्मान करुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.तसेच रामदासजी ताठे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देवुन मान ना पान और मै तेरा मेहमान या वृत्तीच्या नवनेतृत्वाखाली काम करण्यापेक्षा सन्मानपुर्वक वागवणार्या मंडळीसमवेत काम करणे गरजेचे असुन येत्या थोड्याच दिवसात पुणे जिल्हा पक्षमय करण्याचा प्रयत्न करेन.आसे सांगितले मार्गदर्शक आद.अशोकजी तांबे,शशिकांत जी शिंदे,रोहिदासजी वाघमारे,भिमसेनजी जाधव यांनीही आपले मनोगत मांडले.विचारमंचावर यांसोबत पक्षाचे उपाध्यक्ष मा.मोहनजी बोदाडे,मुंबई प्रदेश सरचिठणीस मा.अस्लमजी शेख,उपस्थित होते.अध्यक्षिय भाषणामध्ये अध्यक्षांनी आपले विचार मांडताना हा प क्ष सर्व सामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून काम करणार आहे.जेथे जेथे अन्याय होईल तेथे तेथे जशास तसे उत्तर दिले जाईल.आम्ही रस्त्यावरिल लढाई लढणारे असुन संघर्ष हा आमचा रक्त गट आहे असे समजल्यास वावगे ठरणार नाही.या पक्षा मध्ये सामिल होणारा प्रत्येक जण याचा यथोचित सन्मान करुन त्याला आदरपुर्वक वागणूक दिली जाईल तसेच येणार्या थोड्याच दिवसात पक्षाची उच्चस्तरिय कमिटी स्थापन करुन जाहिर करण्यात येईल.असे सांगितले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबईतील जिल्हा अध्यक्ष आद.अनिलजी लगाडे,तुकारामजी हेगडे,चंद्रकांतजी तांबे,चंद्रकांतजी रुपेकर,जाँन भाई,धरमविर कजानियाँ माणिकजी शिंदे,गौतमजी बनसोडे,अंधेरी येथिल सर्व कामगार युनियनचे पदाधिकारी,मुंबईतील महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.वार्ड नं149 मधिला महिला पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रके देण्यात आली व त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.कार्यक्रमामध्ये पोलिस प्रशासनातुन API आणि त्यांचे सहकारी आले होते त्यांनी पक्षाच्या कामाची दखल घेवून कार्यक्रमामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उत्तम प्रकारे आपले काम पार पाडले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *