कल्याणमधील मोहित गायकवाड या युवकाला न्याय मिळवून देण्यात यावा यासाठी कल्याण तहसीलदार यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दिले निवेदन…

Share

कल्याण : देशात व महाराष्ट्रात धर्मांधता जातीय दहशतवाद दिवसेंदिवस वाढत असून त्यात दलित, शोषित व सर्वसामान्यांच्या जीवावर बेतत असून त्यात शासनात कुचकामी काम करणारे प्रशासकीय अधिकारी जबाबदार असून जिल्हा नांदेड येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करण्याचा पुढाकार घेतला म्हणून अक्षय भालेराव चा बोंढार जिल्हा नांदेड येथे खून करण्यात आला. मुंबईत मुलीच्या शासकीय वसतीगृहामध्ये राहणाऱ्या अकोल्यातील दलित विद्यार्थी हिना मेश्राम हिच्यावर पाशवी बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील गिरीधारी केशव तबघाले या मातंग तरुणाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याला लोखंडी सळयाने बेदाम मारून ठार करण्यात आले फक्त तीन हजार रुपयांसाठी कल्याण शहरात भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल अत्यंत गलिच्छ मजकूर प्रसिद्ध केला जातो म्हणून काढून टाका म्हणून सांगितले म्हणून मोहित सुनील गायकवाड यांचे अपहरण करून २५ ते ३० जणांच्या टोळक्याने अपहरण करून मारहाण केली. गुजरातमध्ये क्रिकेटच्या बॉल ला स्पर्श केला म्हणून दलित युवकाचा कथित उच्चवर्णी यांनी हाताचा अंगठा कापून काढला अशा अनेक घटना दिवसेंदिवस देशात, महाराष्ट्रात धर्मांध व जातीय दहशतवादाच्या घटना वारंवार घडत आहेत. वाढत आहेत ह्या घडलेल्या आणि इतर सर्व घटनांवरती संबंधित सर्वांची चौकशी होऊन कारवाई होऊन राज्यात देशात अशा प्रकारे कुठेच अशा हत्या होणार नाहीत तसेच धर्मांध, जातीय दहशतवाद निर्माण होणार नाही अशी उपाययोजना लवकरात लवकर करण्यात यावी म्हणून दिनांक २०/६ २०२३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना कल्याण तहसीलदार यांच्यामार्फत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने चर्चा करून निवेदन दिले. तहसीलदार यांनी तात्काळ या निवेदनावर शेरा मारून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी पाठवले. यावेळी प्रसिद्ध स्तंभलेखक व राजकीय विश्लेषक दादाभाऊ अभंग, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणराव आंभोरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्हाचे नेते माणिकराव उघडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) उद्योग आघाडीचे नेते सतीश जाधव, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डोंबिवली महिला अध्यक्षा जान्हवी झा, संगीता पवार, दिलीप भगर व युवा नेते शोएब भाई शेख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *