डोंबिवली : आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई मुरलीधर पवार यांचे पती आंबेडकरी चळवतील कार्यकर्ते मुरलीधर यमाजी पवार यांचे शुक्रवार दिनांक ३० जून २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कालकथित मुरलीधर पवार व शारदाबाई पवार हे डोंबिवलीतील आंबेडकरी चळवळीतील अत्यंत एकनिष्ठ असं कुटुंब असून त्यांची तिन्ही मुलं ही आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत. मुरलीधर पवार यांनी प्रचंड काबाडकष्ट व मेहनत करून कुटुंबाचे पालनपोषण केलं व शारदाबाई पवार यांनी त्यांना मोलाची साथ दिली. आजही त्या आपल्या कुटुंबासाठी प्रचंड मेहनत आणि कष्ट करीत आहेत. या दांपत्याने आपल्या तिन्ही मुलांवर चांगले संस्कार तर केलेच पण आंबेडकरी चळवळीत प्रामाणिक काम करण्याची शिकवण दिली. आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक आंदोलन, मोर्चा, कार्यक्रम असू द्या किंवा कुठल्याही प्रकारची घटना घडू द्या पवार कुटुंब हे सर्वात पहिलं उपस्थित राहणार कुटुंब आहे. मुरलीधर यमाजी पवार यांचे अंत्यदर्शन माजी नगरसेवक जनार्दन परशुराम म्हात्रे यांनी घेतले. मुरलीधर पवार यांची अंत्ययात्रा डोंबिवली (प) येथील त्यांच्या निवासस्थानातून डोंबिवली (पूर्व) येथील स्मशानभूमीत आल्यानंतर धार्मिक विधिनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) या पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रल्हाद दुंदा जाधव, निर्णायक एल्गार चे संपादक दादाभाऊ अभंग, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे नेते माणिकराव उघडे, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणराव आंभोरे, प्रसिद्ध कवी दिपशाम मंगळवेढेकर, सामाजिक कार्यकर्ते बी. आर. पंचांगे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष किशोर मगरे, खजिनदार सिद्धार्थ रणपिसे, संघटक वसंत टेकाळे, उद्योग आघाडीचे सतीश जाधव, स्वारीपचे राजू दोंदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) कल्याण डोंबिवली जिल्हा महिला अध्यक्षा मीनाताई साळवे, रिपब्लिकन सेनेचे आनंद नवसागरे, पवन म्हात्रे, परेश म्हात्रे, सिद्धार्थ खैरनार, चंदूशेठ ठुकरल, जिजाभाऊ गोंडगे, होमगार्डचे डोंबिवलीचे प्रमुख ए.के. खैरनार आदी उपस्थित होते.
मुरलीधर पवार यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी शारदाताई मुरलीधर पवार, मुलगे तुकाराम पवार, संजय पवार, शशी पवार, तसेच मुली सुनीता भारत रणधीर, भारती केशव रणधीर व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
मुरलीधर पवार यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार दिनांक ९ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता रूम न. १४, शैलेश बिल्डिंग, शिवतीर्थ सोसायटी, सम्राट चौक, सिटी हॉस्पिटल समोर डोंबिवली (पश्चिम) येथे आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पवार कुटुंबीयांनी केले आहे.
