घाटकोपर: सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावळेराम वाघचौरे व दादाभाऊ सावळेराम वाघचौरे यांच्या बहिण व निवृत्ती संभाजी अभंग यांच्या आई कंकुबाई संभाजी अभंग यांचे वयाच्या ८० व्या वर्षी घाटकोपर येथे मंगळवार दिनांक ४/७/२०२३ रोजी रात्री ११.५५ वा. दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी १२.३० वाजता त्यांच्या निवासस्थानावरून घाटकोपर बर्वे नगर स्मशानभूमी येथे आणल्यानंतर त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. कंकुबाई संभाजी अभंग यांना निर्णायक एल्गार चे संपादक दादाभाऊ अभंग यांनी सर्व उपस्थितांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित अभंग, वाघचौरे परिवारातील तसेच सर्व नातेवाईकांनी कंकुबाई संभाजी अभंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कंकुबाई संभाजी अभंग यांच्या पाठीमागे सूना नंदा तुकाराम अभंग, संगीता ज्ञानदेव अभंग, वैशाली निवृत्ती अभंग, मुलगा निवृत्ती संभाजी अभंग, मुलगी संतोषी बाजीराव वंजारे व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कंकुबाई संभाजी अभंग यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार दिनांक ९/७/२०२३ त्यांच्या निवासस्थानी, पंचशील चाळ कमिटी, साने गुरुजी नगर, असल्फा व्हीलेज, घाटकोपर (पश्चिम) येथे होणार आहे. तरी या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे अभंग आणि वाघचौरे परिवाराने विनंती केली आहे.
